झी २४ तास वेब टीम, मुंबई
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लोकपालाची मागणी करणा-या अण्णा हजारे यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती गुप्तचरांच्या हाती आली आहे. या पार्श्वभूमीवर अण्णांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात येत आहे. आवश्यकता भासल्यास अण्णांच्या सुरक्षेत वाढ करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्राच्या गृहखात्याने दिली आहे.
अण्णांचे सहकारी असलेल्या अॅडव्होकेट प्रशांत भूषण आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर अलिकडेच हल्ला झाला आहे. समाजकंटकांकडून अण्णांवर देखील हल्ला होण्याचा धोका निर्माण झाला आहे. हा धोका लक्षात घेऊनच अहमदनगर जिल्हा पोलीस अधिक्षकांना अण्णांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यास सांगितल्याचे पोलीस महासंचालकांनी सांगितले.