अनुजच्या कुटुंबियांची मृतदेहासाठी धडपड

अनुजचा मृतदेह मिळवण्यासाठी कुटुंबियांना झगडावं लागतंय. अनुजचा मृतदेह लवकरात लवकर मिळवण्यासाठी भारतीय उच्चायुक्तानं प्रयत्न करावेत अशी मागणी अनुजच्या कुटुंबियांनी केलीय.

Updated: Jan 3, 2012, 11:46 PM IST

 www.24taas.com, पुणे

 

अनुज बिडवेचे आई-वडील आज किंवा उदया मँचेस्टरला जाण्याची शक्यता आहे. अनुज बिडवेच्या हत्येप्रकरणी ब्रिटीश पोलिसांनी काल पुण्यात येऊन बिडवे कुटुंबीयांची भेट घेतली. अनुजचा मृतदेह लवकरात लवकर मिळवण्यासाठी भारतीय उच्चायुक्तानं प्रयत्न करावेत, अशी मागणी अनुजच्या कुटुंबीयांनी केलीय.

 

ब्रिटनमध्ये MS चं शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या पुण्यातील अनुज बिडवेच्या हत्येप्रकरणी ब्रिटीश प्रशासनावर टीका झाल्यानंतर अखेर ब्रिटीश प्रशासनाला चुकीची जाणीव झाली आणि त्यांनी बिडवे कुटुंबीयांची माफी मागितलीय. मॅँचेस्टर पोलीसांनी सोमवारी अनुजच्या कुटुंबीयांची भेट घेतली. अनुजच्या हत्येप्रकरणी किरॉन स्टँपल्टन या प्रमुख आरोपीसह पाच जणांना ब्रिटनमध्ये अटक करण्यात आलीय. तसच याबद्दलची माहिती देणा-याला पन्नास हजार पाऊण्डसचं बक्षीसही जाहीर करण्यात आलंय. पोलिसांचा तापस योग्य दिशेनं सुरू असल्याचं सांगत मँचेस्टर पोलीसांचे बिडवे कुटुंबीयांनी आभार मानलेत.

 

मात्र असं असलं तरी अनुजचा मृतदेह मिळवण्यासाठी कुटुंबियांना झगडावं लागतंय. अनुजचा मृतदेह लवकरात लवकर मिळवण्यासाठी भारतीय उच्चायुक्तानं प्रयत्न करावेत अशी मागणी अनुजच्या कुटुंबियांनी केलीय. अनुजच्या मृतदेहाचं आज पुन्हा पोस्ट मॉर्टेम करण्यात येणार आहे. आजचे रिपोर्ट आणि यापूर्वी करण्यात आलेल्या पोस्ट मॉर्टेमचे रिपोर्ट जुळले तर अनुजचा मृतदेह लगेचच भारतीय उच्चायुक्तांना सोपवण्यात येणार असल्याचं अनुजच्या बहिणीनं सांगितलंय.

 

एकुलता एक मुलगा गमावल्यानं बिडवे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. मॅंचेस्टर पोलिसांनी भेट घेवून त्यांना दिलासा दिला असला तरी अनुजचा मृतदेह लवकरात लवकर ताब्यात मिळावी अशी त्यांची इच्छा आहे.