www.24taas.com, मुंबई
निराशेच्या गर्तेत सापडलेल्या एचआयव्ही बाधितांच्या जीवनात आनंद देणारी घटना पुण्यात घडली आहे. दोन एचआयव्ही बाधितांनी लग्न करुन समाजामध्ये एक अनोखा आणि तितकाच मोलाचा संदेश दिला आहे. सुर्योदय एडस फाऊंडेशनच्या पुढाकारातून विवाहसोहळा पार पडला. दुर्दैवावर मात करत आयुष्य जगण्याचा निर्णय या दोघांनी घेतला.
त्यानंतर यांचा विवाहसोहळा शनिवारी मोठ्या थाटामाटात आणि तितक्याच आनंदात पार पडला. सुर्योदय एडस फाऊंडेशनच्या पुढाकारातून हे लग्न लावून देण्यात आलं. एचआयव्ही बाधिंतांना वंचिताचं जीण जगाव लागू नये, ही त्यामागची भावना. एचआयव्ही झाल्यानं या दोघांच्या जगण्याची आस मावळून गेली होती. मात्र त्यांच्या कुटुंबीयांबरोबरच कार्यकर्त्यांचा आधारही त्यांना मिळाला.
त्यांच्यात बांधल्या गेलेल्या सहजीवनाच्या रेशीमगाठीनं त्यांचं जगणं आता सुंदर होणार आहे. हे लग्न त्या दोघांचं असलं तरी त्या दोघांपुरत मर्यादित नाही. एक सामाजिक संदेश यानिमित्तानं दिला जातो आहे. त्यामुळंचं या नवदाम्पत्याचं मनापासून अभिनंदन आणि लक्ष लक्ष शुभेच्छाही.