कुष्ठरोग्यांचे भोग सरेना...

काही लोक जन्मत:च कमनशिबी असतात. पुण्याजवळ दापोडी इथ अशीच कमनशिबी लोकांची वस्ती आहे. जीवनातला संघर्ष संपणार कधी त्यांच्या आधीच्या पिढीनेही केला आणि सध्याची पिढीही करतेय.. आणि उद्याची पिढीही तोच विचार करतेय

Updated: Apr 19, 2012, 10:03 PM IST

www.24taas.com, पुणे

 

काही लोक  जन्मत:च  कमनशिबी असतात. पुण्याजवळ दापोडी इथ अशीच कमनशिबी लोकांची वस्ती आहे. जीवनातला संघर्ष संपणार कधी त्यांच्या आधीच्या पिढीनेही  केला आणि सध्याची पिढीही करतेय.. आणि उद्याची पिढीही तोच विचार करतेय...

 

पुण्याजवळच्या दापोडीतील आनंदवन कुष्टरोगी वसाहत...जवळपास १२० कुटुंबे आणि हजारांवर लोक या वस्तीत राहतात. गावकुसाबाहेरची जागा म्हणून पन्नास वर्षांपूर्वी अनाहूतपणे कुष्ठरोगी याठिकाणी आले. सुरुवातीला पाच-दहा संख्येने असलेल्य़ा कुष्ठरुग्णांची संख्या काही दिवसातच १०० च्या घरात पोहचला आणि इथं कुष्टरुग्णांची वसाहत झाली... जात पात कसलीही बंधन न पाळता ही लोक इथ रहातात...कुष्टरोग एवढचं एक समान सूत्र त्यांच्यात आहे...पन्नास वर्षांपूर्वीचे त्यांचं दु;ख आणि जगण्याचा संघर्ष अजूनही तसाच आहे...इथल्या कुष्ठरुग्णांची मुलं निरोगी असली तरी त्यांना नोकरी मिळवण्यात अडचणी येत आहेत.

 

स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने या वस्तीतल्या लोकांनी एकत्र येत दुधाचा व्यवसाय सुरु केलाय. तर काही महिलांनी पिठाची चक्की सुरु केलीय. परंतु समाजाची मानसिकताच बदलत नसल्यानं त्यांचा हा संघर्ष तोकडा पडतोय. हाडामांसाच्या या नागरिकांनाही सामान्य जीवन जगायचंय. आपणं जे आयुष्य भोगलंय ते आपल्या मुलांबाळांना भोगावं लागू नये एवढीच यांची अपेक्षा आहे. यासाठी समाजानं कुष्ठरुग्णांच्या कुटुंबाना आपलं म्हणण्याची गरज आहे.