कोंडुस्करांच्या कमुद ड्रग एजन्सीचा परवाना रद्द

बेकायदा कॅटामाईन विक्रीप्रकरणी सांगलीतल्या कोंडुस्कर यांच्या कमुद ड्रग एजन्सीचा परवाना रद्द करण्यात आलाय.

Updated: Dec 17, 2011, 09:12 AM IST

झी २४ तास वेब टीम,  सांगली

 

बेकायदा कॅटामाईन विक्रीप्रकरणी सांगलीतल्या कोंडुस्कर यांच्या कमुद ड्रग एजन्सीचा परवाना रद्द करण्यात आलाय.

 

अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईत या कंपनीचा परवाना रद्द करण्यात आलाय. तर मालक अभिजीत कोंडूस्करांच्या विरोधात सांगलीतल्या कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.मालक अभिजीत कोंडूस्कर फरार आहेत.. पोलिस कोंडूसकरांचा कसून शोघ घेतायत.

 

जून महिन्यात कामुद कंपनीतून ८० किलोकॅटामाईन आणि ४३२  किलो ३एम या अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता. याप्रकरणी अखेर सहा महिन्यांनी अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई केलीय.