कोंबडी पळालीनं, महापौरांना नाचवलं

'कोंबडी पळाली' या गाण्याने साऱ्यांनाच अक्षरश: वेड लावलं आहे, काही वर्षापूर्वी आलेल्या या गाण्याने आपल्या तालावर साऱ्यांनाच थिरकायाला लावले. तर आता याच कोंबडी पळाली गाण्याने पिंपरी-चिंचवडचे महापौर योगेश बहल यांना देखील नाचायाला भाग पाडलं आहे.

Updated: Dec 30, 2011, 05:58 PM IST

झी २४ तास वेब टीम, पिंपरी-चिंचवड

'कोंबडी पळाली' या गाण्याने साऱ्यांनाच अक्षरश: वेड लावलं आहे, काही वर्षापूर्वी आलेल्या या गाण्याने आपल्या तालावर साऱ्यांनाच थिरकायाला लावले. तर आता याच कोंबडी पळाली गाण्याने पिंपरी-चिंचवडचे महापौर योगेश बहल यांना देखील नाचायाला भाग पाडलं आहे.

माझ्यासारखा सुसंस्कृत महापौर शहराला आतापर्यंत मिळाला नाही, असा दावा काही दिवसांपूर्वीच पिंपरी-चिंचवडचे महापौर योगेश बहल यांनी केला होता. मात्र, खुद्द महापौरांनीच एका सार्वजनिक कार्यक्रमात कोंबडी पळालीच्या गाण्यावर असा काही ठेका धरला, की उपस्थितही अवाक झाले.

झी २४ तासनं महापौरांचा हा सुसंस्कृपणा उघड केला आहे.  त्याचं हे रुप पाहून उपस्थितांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत होतं. या कार्यक्रमातला हा नृत्याविष्याकार पाहून महापौर किती सुसंस्कृत आहेत असा सवाल उपस्थित करण्यात येतो आहे.