खून करणारा बोगस वकील जाळ्यात

खुनाचे आरोप असलेल्या एका भामट्यानंच पुण्यात वकिलीचा धंदा थाटला होता. वकिलीचं कुठलंही शिक्षण न घेतलेला अमितकुमार पुणेकरांना सर्रास गंडा घालत होता. अखेर त्याचा पर्दाफाश झाला.

Updated: Jul 23, 2012, 09:27 PM IST

www.24taas.com, पुणे

 

खुनाचे आरोप असलेल्या एका भामट्यानंच पुण्यात वकिलीचा धंदा थाटला होता. वकिलीचं कुठलंही शिक्षण न घेतलेला अमितकुमार पुणेकरांना सर्रास गंडा घालत होता. अखेर त्याचा पर्दाफाश झाला. अमित कुमार डावर. पुण्यातला बोगस वकील. वकिलीचं कुठलंही प्रशिक्षण त्यानं घेतलेलं नाही. तरीही तो पुण्यातल्या नामांकित बँकांच्या पॅनेलवर वकील आहे.

 

पुण्यातल्या सचिन इंगुले या वकिलाच्या नावानं तो वकिली करत होता. इंगुले याच्या नावाचे लेटरहेड आणि शिक्के त्यानं बनवून घेतले होते. आणि अनेक बँकांना आणि लोकांना गंडा घातला होता. हा गोरखधंदा इंगुलेला कळला आणि या प्रकरणाचा पर्दाफाश झाला. अमितकुमार विरोधात बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

 

धक्कादायक बाब म्हणजे त्याच्यावर याआधी खुनासारखे गुन्हे दाखल आहेत. तरीही तो बिनदिक्कत वकिली करत होता. अमित कुमार मुळचा हरियाणाचा आहे. त्याची ही बोगस वकिली कधीपासून सुरू आहे आणि त्यानं आतापर्यंत कुणाकुणाला फसवलं. याचा तपास पोलीस करत आहेत.