www.24taas.com, इचलकरंजी
'झी २४ तास' इम्पॅक्टमुळे सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनचं पाणी दुष्काळी जत तालुक्याला मिळालं आहे. म्हैसाळ योजनेचे पाणी जतच्या शिवारात पोहचलं असून 'कृष्णा' जत' च्या अंगणी आली आहे. या पाण्याचं पूजन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी डोरली गावात केलं. यावेळी गृहमंत्री आर.आर.पाटील, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, वनमंत्री पतंगराव कदम उपस्थित होते.
म्हैसाळ जलसिंचन योजनेचं पाणी दुष्काळी जत तालुक्याला देण्याऐवजी, हे पाणी मध्येच तासगावला पळवल्याचे वृत्त 'झी २४ तास'नं प्रसारीत केलं होतं. त्यानंतर याची दखल घेत राज्य सरकारनं आणि म्हैसाळ उपसा जलसिंचन विभागानं याची तातडीने दखल घेतली.
गेल्या पन्नास वर्षापासून जतचे दुष्काळग्रस्त शेतकरी या पाण्याची वाट पाहत होते. 'झी २४ तास'च्या पाठपुराव्यामुळं पाणी मिळाल्यानं दुष्काळग्रस्त जत तालुक्याला मोठा दिलासा मिळाला.