नवा जमीन घोटाळा, पुन्हा पवारांचाच गोतावळा!

केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या कुटुंबियांवर पुन्हा एकदा जमिनीच्या गैरव्यवहाराचा आरोप होतोय. जिल्हाधिका-यांचा बनावट आदेश तयार करून महार वतनाची जमीन लाटल्याचा आरोप शर्मिला पवार यांच्यावर करण्यात आलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाऊ श्रीनिवास पवार यांच्या शर्मिला पवार या पत्नी आहेत.

Updated: May 4, 2012, 07:18 PM IST

www.24taas.com, पुणे

केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या कुटुंबियांवर पुन्हा एकदा जमिनीच्या गैरव्यवहाराचा आरोप होतोय. जिल्हाधिका-यांचा बनावट आदेश तयार करून महार वतनाची जमीन लाटल्याचा आरोप शर्मिला पवार यांच्यावर करण्यात आलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाऊ श्रीनिवास पवार यांच्या शर्मिला पवार या पत्नी आहेत.

पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यात रीहे गावातली ही जमीन आहे. ही ७८ गुंठे जमीन महार वतनाची आहे. महार वतनाची जमीन असल्याने, ती विकण्यासाठी जिल्हाधिका-यांची परवानगी घ्यावी लागते. मात्र, शर्मिला पवार यांनी जमीन विक्रीसाठी जिल्हाधिका-यांचा  बनावट परवानगी आदेश तयार केला. आणि त्या आधारे ही जमीन बळकावली, असा आरोप जमिनीचे मालक असलेल्या शेतक-यांनी केलाय.

अशाच प्रकारे पवार यांनी महार वतनाच्या याच गावातल्या इतरही काही जमिनी बळकावल्याचा आरोप करण्यात आलाय. जिल्हाधिका-यांच्या बनावट आदेशानं सर्वच जमीन घेतल्यानं, भूमिहीन झाल्याचं शेतक-यांचं म्हणणं आहे. .