पक्षाची वाताहत रोखायला दादांनी कसली कंबर

पिंपरी-चिंचवडचा बालेकिल्ला वाचवण्यासाठी आता थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनीच कंबर कसलीय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीमुळे पक्षाची वाताहत होत आहे. हे सगळं थांबवण्यासाठीच अजित पवार यांनी उद्या महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

Updated: Nov 9, 2011, 01:12 PM IST

झी २४ तास वेब टीम, पुणे

 

पिंपरी-चिंचवडचा बालेकिल्ला वाचवण्यासाठी आता थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनीच कंबर कसलीय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीमुळे पक्षाची वाताहत होत आहे. हे सगळं थांबवण्यासाठीच अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड, भोसरीच्या तीनही आमदारांची आणि पदाधिका-यांची उद्या महत्त्वाची बैठक बोलावली आहे. त्यात गटबाजीवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पिंपरी-चिंचवडच्या बालेकिल्ल्यात लक्ष्मण जगताप आणि विलास लांडे या दोघा आमदारांनी अजित पवारांवरच तोफ डागत पक्ष सोडण्याचा इशारा दिला होता, तर आठ महिन्यांच्या बंडानंतर आझम पानसरे यांना पक्षात पुन्हा प्रवेश मिळाला होता, पण पद न मिळाल्यानं ते पुन्हा बंडाच्या तयारीत आहेत, या सगळ्यांची झाडाझडती उद्या अजित दादा घेणार आहेत.