www.24taas.com,पुणे
पुणे-नाशिक महामार्गावर रविवारी एक टेम्पो उलटून 7 जणांचा मृत्यू झाला तर 23जण जखमी झाले. तुकाराम बीज सोहळ्यासाठी संगमनेर आणि अकोले तालुक्यातील भाविक देहूला जात होते. या भाविकांच्या टेम्पोला पिंपळवंडी गावाजवळ अपघात होऊन 7 भाविक जागीच ठार झाले तर 23 भाविक जखमी झाले आहेत.
मृतांमध्ये दत्तू शिंदे, ताराबाई देशमुख, शिवाजी कारले, संपत जगताप, आबासाहेब खामकर, दिनकर कडलग यांचा समावेश आहे. जखमींना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
[jwplayer mediaid="59992"]