पुण्यात भरचौकात तरुणाची हत्या

Updated: Nov 5, 2011, 01:26 PM IST

 झी २४ तास वेब टीम, पुणे

पुणे शहरात भरदिवसा टिळक रोडवरील हिराबाग चौकात एका तरुणाची हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हिराबाग चौकातील एका लॉटरी सेंटरमध्ये काम करणाऱ्या तनमय मोरेची हत्या करण्यात आली. लॉटरी सेंटरमध्ये घुसून दोन सशस्त्र तरुणांनी  तनमय मोरेची हत्या केल्या नंतर हे तरुण फरारी झाले आहेत. अनैतिक संबंधातून ही हत्या घडवण्यात आल्याचा पुणे पोलिसांचा कयास आहे.

Tags: