महालक्ष्मी मंदिराचे सारे दरवाजे खुले...

कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील चारपैकी दोनच दरवाजे आतापर्यंत खुले होते. मात्र विधानसभेत आलेल्या या विषयीच्या लक्षवेधीमुळे तसेच विविध पक्ष संघटनांच्या रेट्यामुळे गृहमंत्र्यांनी मंदिराचे दोन बंद दरवाजेही खुले करण्याचा आदेश दिला आहे.

Updated: Apr 5, 2012, 04:01 PM IST

कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील चारपैकी दोनच दरवाजे आतापर्यंत खुले होते. मात्र विधानसभेत आलेल्या या विषयीच्या लक्षवेधीमुळे तसेच विविध पक्ष संघटनांच्या रेट्यामुळे गृहमंत्र्यांनी मंदिराचे दोन बंद दरवाजेही खुले करण्याचा आदेश दिला आहे.

सुरक्षेच्या कारणावरून जिल्हा प्रशासनाने मंदिराच्या दक्षिणेकडील आणि उत्तरेकडील दरवाज्यातून जाण्या - येण्यास बंदी केली होती. विविध संघटनांच्या आंदोलनांमुळे या दोन दरवाजातून अपंगांसाठी आणि वृध्दांसाठी येण्याजाण्यातून काही दिवसांपासून परवानगी मिळत होती.

आता मात्र विधानसभेत मांडल्या गेलेल्या लक्षवेधीमुळे चारही दरवाजे सर्वांसाठी खुले करण्याचा निर्णय गृहमंत्र्यांनी घेतला आहे. या  निर्णयाचं सर्वत्र स्वागत होत आहे. त्यामुळे आता भाविकांना जास्त वेळ  तिष्ठत राहावं लागणार नाही. तसंच भाविकांची गैरसोय होणार नसल्याने या निर्णायाचे स्वागतच होत आहे.