माऊलींची पालखी जेजुरीकडे मार्गस्थ

माऊलींची पालखी आज सासवडहून जेजुरीकडे मार्गस्थ होतेय. तर संत तुकोबांची पालखी यवतहून वरवंडकडे प्रस्थान ठेवतेय. जेजुरीत माऊलींच्या पालखीचं भंडारा उधळत स्वागत करण्यात येणार आहे.

Updated: Jun 17, 2012, 09:45 AM IST

www.24taas.com, पुणे

माऊलींची पालखी आज सासवडहून जेजुरीकडे मार्गस्थ होतेय. तर संत तुकोबांची पालखी यवतहून वरवंडकडे प्रस्थान ठेवतेय. जेजुरीत माऊलींच्या पालखीचं भंडारा उधळत स्वागत करण्यात येणार आहे.

एकूणच अवघं वातावरण सावळ्या विठूरायाच्या नामस्मरणात दंग झालंय.. वारक-यांना आता विठूरायाच्या भेटीची ओढ लागलीय.. एकामागून एक पालख्या पंढरपूरच्या दिशेनं निघाल्यात.. कित्येक दिवसांच्या या पायी प्रवासात वारक-यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.. पाऊस, ऊन, वारा याची जराही तमा न बाळगता विठूरायाच्या भेटीच्या ओढीनं वारकरी मार्गक्रमण करत असतात.

वारीच्यावेळी वारक-यांना आजारांचा सामना करावा लागतो.. अशावेळी या वारक-यांच्या सेवेसाठी विविध संस्था आणि स्वयंसेवी संस्था पुढं येतात.. फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून डॉक्टर चोवीस तास या आजारी वारक-यांवर उपचार करत असतात.