मावळ गोळीबारः ४७ शेतकऱ्यांना अटक

पुण्याजवळच्या मावळ गोळीबार प्रकरणी 47 शेतक-यांना अटक करण्यात आली असून, त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आलीय.

Updated: Mar 30, 2012, 08:12 PM IST

www.24taas.com, पुणे

पुण्याजवळच्या मावळ गोळीबार प्रकरणी 47 शेतक-यांना अटक करण्यात आली असून, त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आलीय.

 

9 ऑगस्ट 2011 रोजी पवना धरणातील पाण्याच्या पाईपलाइनला विरोध करण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. आंदोलनकर्त्या शेतक-यांनी दगडफेक, तोडफोड करत पोलिसांच्या गाडीवरही हल्ला केला होता.

 

यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 3 शेतक-यांचा मृत्यू झाला होता. तसचं काही पोलीसही यात जखमी झाले होते. याप्रकरणी अखेर आज अटकेची कारवाई करण्यात आली. त्यांना वडगाव मावळ कोर्टात हजर केलं असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आलीय.

 

[jwplayer mediaid="74840"]