रेल्वे वेळापत्रकावर परिणाम

पुणे- कामशेत-मळवली दरम्यानची रेल्वे वाहतूक आज सकाळी सव्वा नऊ ते दुपारी पावणे तीन दरम्यान बंद राहणार आहे. रेल्वेपुलाच्या मजबुतीकरणाच्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे पुणे-लोणावळा लोकलसह डेक्कन एक्‍स्प्रेस आणि अन्य गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला.

Updated: May 30, 2012, 03:22 PM IST

www.24taas.com, पुणे

पुणे- कामशेत-मळवली दरम्यानची रेल्वे वाहतूक आज सकाळी सव्वा नऊ ते दुपारी पावणे तीन दरम्यान बंद राहणार आहे.  रेल्वेपुलाच्या मजबुतीकरणाच्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे पुणे-लोणावळा लोकलसह डेक्कन एक्‍स्प्रेस आणि अन्य गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला.

या कामामुळे पुणे-कर्जत-पुणे रेल्वे रद्द करण्यात आलीय.  मुंबईहून सुटणारी डेक्कन एक्‍स्प्रेस फक्त लोणावळ्यापर्यंत धावेल, तर हीच गाडी पुण्याऐवजी लोणावळ्यावरूनच मुंबईकडे रवाना होईल. तर पुणे लोणावळा लोकल लोणावळ्याऐवजी तळेगावपर्यंतच धावणार आहे.

दरम्यान, हैदराबाद-मुंबई एक्‍स्प्रेस, चेन्नई-मुंबई एक्‍स्प्रेस आणि कोइंबतूरहून निघणारी लोकमान्य टिळक टर्मिनस एक्‍स्प्रेस या गाड्या निर्धारित वेळेपेक्षा साडेतीन ते पावणेपाच तास उशिरा पोचणार आहे