शहराचा विकास कसा करायचा?- महापौर

सोलापूर शहराचा विकास कसा होणार हा प्रश्न पडलाय खुद्द नवनिर्वाचीत महापौर अलका राठोड यांना. सोलापूर प्रशासनाकडून अवहेलना होत असल्याचं तसचं प्रशासन विकास कार्यात सहकार्य करत नसल्याचं म्हणण आहे महापौर अलका राठोड यांचं.

Updated: May 9, 2012, 09:18 AM IST

www.24taas.com, सोलापूर 

 

सोलापूर शहराचा विकास कसा होणार हा प्रश्न पडलाय खुद्द नवनिर्वाचीत महापौर अलका राठोड यांना. सोलापूर प्रशासनाकडून अवहेलना होत असल्याचं तसचं प्रशासन विकास कार्यात सहकार्य करत नसल्याचं म्हणण आहे महापौर अलका राठोड यांचं.

 

सोलापूर महापालिकेत चार महिन्यांपूर्वी काँग्रेसनं राष्ट्रवादीच्या सहकार्याने पालिकेत सत्ता हस्तगत केली आहे. उच्चशिक्षित असलेल्या महापौरांनी नागरिकांच्या समस्यांची माहिती घेत प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवण्याचा धडाकाच लावला आहे.

 

त्यामुळे अडचणीत आलेले कर्मचारी आणि पालिका प्रशासनानं त्यांना सहकार्य न करण्याचं ठरविल्याचं चित्र दिसतं आहे. पण आता महापौर नक्की काय करणार? शहराचा विकास कसा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे?