www.24taas.com, पुणे
पुण्यात महापालिकेच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून आकाश चव्हाण या १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. बोपोडी-औंध रस्त्यावर महापालिकेच्या स्विमिंग वि.भा. पाटील पूलमध्ये ही दुर्घटना घडली.
लाईफगार्ड नसल्यानं आकाशला जीव गमवावा लागल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केलाय. या निमित्ताने स्विमिंग टँकच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलाय.