www.24taas.com, पुणे
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाचा गलथान कारभार अजूनही सुरूच आहे. शाळा सुरु होऊन दीड महिना झाला तरी बहुतांश विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळालेलं नाही. याविरोधात शिवसेनेनं अनोखं आंदोलन करत शिक्षणाधिका-यांना बूट, वह्या आणि दफ्तर भेट दिलं.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेत तब्बल ४५ हजार विद्याथी आहेत. शाळा सुरू होऊन दीड महिना झाला तरी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळालेलं नाही. विद्यार्थी फाटके गणवेश आणि फाटके बूट घालून शाळेत येत आहेत. याच्या निषेधार्थ शिवसेनेनं अनोखं आंदोलन करत शिक्षण अधिका-यांना बूट वह्या आणि दफ्तर भेट दिलं.
शिक्षण मंडळाचे अधिकारी मात्र अजूनही या बाबतीत ठोस उत्तर देऊ शकत नाहीत. पिंपरी चिंचवडच नाही तर राज्यातल्या बहुतांश शिक्षण मंडळात असाच कारभार सुरू आहे.