महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे आणि मिलिंद नार्वेकर यांच्या आवाजाचे नमुने घेण्याची परवानगी सत्र न्यायायलानं दिली आहे.
पुण्यात दादोजी कोंडदेव पुतळा हटवल्याप्रकरणी शिवसेनेनं केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. हे हिंसक आंदोलन घडवून आणल्याचा शिवसेनेवर आरोप आहे. हे आंदोलना घडवून आणण्यासाठी नीलम गोऱ्हे आणि मिलिंद नार्वेकर यांच्यातलं फोनवरचं संभाषण टॅप करुन पोलिसांनी कारवाई केली होती.
मॅजिस्ट्रेट कोर्टानं अशा या दोन्ही नेत्यांचे आवाज घेण्याची परवानगी दिली होती. त्याला गो-हे आणि नार्वेकरांनी सत्र न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यावर सुनावणीच्या वेळी पुणे सत्र न्यायालयानं आवाज घेण्याला परवानगी दिलीय.
[jwplayer mediaid="26129"]