साताऱ्यात बंदूक विकत घेताना संरपंचाला अटक

साताऱ्यात अवैधपणे पिस्तूल विकणाऱ्या युवकास आणि विकत घेणाऱ्या सरपंचास पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सातारा जिल्हा गुप्तवार्ता पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार कराड प्रमिलाताई चव्हाण पॉलिटेक्नीक कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या लहूकुमार जयकुमार सिंग या युवकाची झडती घेतली.

Updated: Dec 21, 2011, 05:30 AM IST

झी २४ तास वेब टीम, सातारा

 

साताऱ्यात अवैधपणे पिस्तूल विकणाऱ्या युवकास आणि विकत घेणाऱ्या सरपंचास पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सातारा जिल्हा गुप्तवार्ता पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार कराड प्रमिलाताई चव्हाण पॉलिटेक्नीक कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या लहूकुमार जयकुमार सिंग या युवकाची झडती घेतली असता तो अवैधरित्या शस्त्रविक्री करत असल्याचं समोर आलं.

 

त्याने बनवडीचे सरपंच शंकर कापे यांनी एक लाख रुपयात रिल्व्ह़ॉल्वर विकल्याचं समोर आल आहे. या दोघांना ताब्यात घेण्यात आलं असुन त्यांच्या घराची झडती घेतली असता त्यांच्याकडून २ देशी बनावटीच्या रिव्हॉल्वर, एक पिस्तूल, १३ राऊंड असा मुद्देमाल जप्त केला आहे.