कापूस प्रश्नावर २३ला सर्वपक्षीय बैठक

कापसाच्या प्रश्नावर आंदोलन करणारे अपक्ष आमदार रवी राणा यांनी कृषीमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मध्यस्तीनंतर आपले उपोषण मागे घेतले.

Updated: Nov 20, 2011, 09:48 AM IST

झी २४ तास वेब टीम, अमरावती

कापसाच्या प्रश्नावर आंदोलन करणारे अपक्ष आमदार रवी राणा यांनी कृषीमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मध्यस्तीनंतर आपले उपोषण मागे घेतले.

आमदार रवी राणा यांची प्रकृती अधिकच खालावल्याने सरकारची धावपळ सुरू झाली. कृषीमंत्री विखे-पाटील आमदार राणांच्या भेटीला गेलेत. उपोषण मागे घेण्यासाठी सरकातर्फे राणा यांना लेखी आश्वासन देताना २३ रोजी कापसाच्या प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक घेण्यात येईल, असे सांगण्यात आले. त्यानंतर रवी राणा यांना कृषीमंत्री विखे-पाटील यांनी फळांचा रस देऊन उपोषण सोडले.

रवी राणा यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस होता. कापसाच्या प्रश्नावर रवी राणा कायम राहिल्याने सरकारची कोंडी झाली होती. मात्र, ही कोंडी सरकारने शेवटी फोडली