खडसेंनी वीज दरवाढीवरुन खडसावले

MERCनं केलेली वीजदरवाढ ही भ्रष्टाचाराची तूट भरून काढण्यासाठी असल्याची टीका विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केलीय. या वाढीचा त्यांनी निषेध केला असून राज्यभरात याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय

Updated: Nov 1, 2011, 05:04 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

MERCनं केलेली वीजदरवाढ ही भ्रष्टाचाराची तूट भरून काढण्यासाठी असल्याची टीका विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केलीय. या वाढीचा त्यांनी निषेध केला असून राज्यभरात याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय. दरम्यान, घरगुती ग्राहकांसाठी प्रतियुनिट 41 पैशांची दरवाढ महावितरणनं जाहीर केलीय. राज्यातल्या दीड कोटी घरगुती ग्राहकांना या दरवाढीचा फटका सहन करावा लागणार आहे. यामुळे 300 युनिटपर्यंत वीज वापर असणा-या ग्राहकांच्या वीज बिलात 100 ते 150 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. या वीज दरवाढीचा भाजपानं निषेध केलाय. बाहेरची वीज खरेदी करतांना प्रचंड भ्रष्टाचार होतोय त्यामुळेच तुट भरून काढण्यासाठी दरवाढ करण्यात आली असल्याचा आरोप खडसेंनी केलाय.