दोन अपघातांत पाच ठार

गोंदिया आणि तलासरी येथील झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. गोंदियात तीन तर तलासरीत दोन जण अपघातात ठार झालेत. तर सायन-पनवेल मार्गावर कंटेनर पलटी झाल्याने वाहतुकीला अडथळा झाला.

Updated: May 12, 2012, 04:17 PM IST

www.24taas.com, तिरोडा

 

[caption id="attachment_99647" align="alignleft" width="300" caption="सायन-पनवेलमार्गावर कंटेनर पलटी झाल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला."][/caption]

गोंदिया जिल्ह्यातल्या तिरोडा तालुक्यात ट्रक-सुमोची धडक होऊन झालेल्या अपघातात तीन ठार तर चार जण गंभीर जखमी झालेत. लग्न समारंभ आटोपून गावाकडे परतत असलेल्या टाटासुमोला भरधाव ट्रकने धडक दिली.

 

यात सुमोत बसलेल्या सहा वर्षांच्या बालकासह दोघांचा अल्पवयीन मुलांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. तर चालक गंभीर जखमी असून इतर 23 जखमी झाले. ही घटना तालुक्‍यातील तिरोडा ते चिरेखनी दरम्यान शुक्रवारी रात्री साडेदहाला घडली. मृतांमध्ये दर्शन व्यंकटेश्‍वर भगत( ६), सरिता मधूकर पारधी( 12) दोन्ही रा. अर्जुनी आणि निशा भैय्यालाल पारधी( 13) रा. पालडोंगरी यांचा समावेश आहे.

 

तर दुसऱ्या अपघातात तलासरीजवळ टँकर आणि कंटेनरच्या धडकेत दोन जणांचा मृत्यू झालाय. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टँकरला कंटेनरला मागून धडक दिली. या धडकेत आयआरबीचा एक इंजिनिअर आणि टँकरचालकाचा मृत्यू झाला. यात एक जण जखमी झालाय. तर दुस-या घटनेत सायन पनवेल महामार्गावर सानपाडाजवळ ट्रेलर उलटल्याने पनवेलकडे जाणारी वाहतूक ठप्प झालीय. ट्रेलरबाजूला काढण्याचे काम सुरु आहे.

 

 बेधुंद कारचालकाचा थरार

बातमी नाशिकहून...नाशिकमधील सिडकोच्या उत्तमनगर परिसरात कालरात्री एका बेधुंद कारचालकाचा थरार नागरिकांनी अनुभवला. बेफाम वेगात गाडी चालवणा-या एका कारचालकानं चार ते पाच नागरिकांना जखमी केलं. यात दोन मोटरसायकलस्वार आणि दोन सायकलस्वारांचा समावेश आहे.

 

त्यानंतर रस्त्यात उभ्या असलेल्या मारूती गाडीला धडक देवून महाकाली चौकातून कारचालक फरार झाला. घटनेनंतर मोठ्या संख्येनं नागरिक रस्त्यावर उतरले. पोलिसांनी नाकाबंदी करून कारचालकाला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात त्यांना यश आलं नाही.