नाशिक-पुणे मार्गावरील वाहतूक ठप्प

ऊस शेतकर् य़ांना पाठिंबा देण्यासाठी आज सकाळी मनसेने रस्ता रोखल्याने नाशिक-पुणे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

Updated: Nov 10, 2011, 05:39 AM IST

झी २४ तास वेब टीम, नाशिक

 

ऊस दरवाढीवर तोडगा निघत नसल्यानं शेतक-यांचं आंदोलन चिघळतच चाललंय. आज सकाळी मनसेने रस्ता रोखल्याने नाशिक-पुणे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

 

बारामतीच्या शेतकरी कृती समितीने आज शहर बंदची हाक दिलीय. तर शेतक-यांच्या विविध संघटना आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन करणार आहेत. त्यातच आज मनसेने रस्ता रोखल्याने नाशिक-पुणे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. ऊस शेतकर् य़ांना पाठिंबा देण्यासाठी मनसेने आंदोलन केलं आहे. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे.