Mangal Transit In Taurus : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक महिन्यात जेव्हा ग्रहांचं गोचर होत म्हणजे ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तेव्हा ग्रह गोचरमुळे जाचकाच्या आयुष्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होतो. ज्योतिषशास्त्रानुसार येत्या 12 जुलैला मंगळ मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. आत्मविश्वास, धैर्य आणि शौर्याचा कारक मंगळ मिथुन राशीत प्रवेश केल्यानंतर पाश्विक योग निर्माण होणार आहे. हा धोकादायक योग काही राशींसाठी घातक ठरणार आहे. (Mangal Transit In Taurus will be created Pashvik yog Obstacles in work with financial losses for these zodiac signs)
या राशीच्या लोकांसाठी पाश्विक योग खूपच धोकादायक असणार आहे. कोणत्याही प्रकारचे निर्णय या काळात घेऊ नका. तुम्हाला अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. यासोबतच तुम्हाला कोणताही मोठा निर्णय घ्यायचा असेल तर वडिलधाऱ्यांचा सल्ला घ्या. नाही तर तुमचे नुकसान होईल. वैवाहिक जीवनात काही समस्या निर्माण होणार आहे. विनाकारण या दिवसांमध्ये रागराग करु नका. तुमच्या आई-वडिलांच्या तब्येतीबद्दल तुम्ही थोडे चिंतेत असणार आहात. या काळात तुमचा पैसा अधिक खर्च होणार आहे. कामाच्या ठिकाणीही थोडे सावध राहा.
या राशीसाठीही पाश्विक योग अतिशय धोकादायक ठरणार आहे. मंगळ या राशीच्या सहाव्या घरात असणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम होणार आहे. कर्ज घेण्याची गरज भासणार आहे. कामाच्या ठिकाणी थोडे सावध राहा, कारण वरिष्ठ अधिकारी किंवा सहकाऱ्यांशी काही मुद्द्यावरून वाद होण्याची शक्यता आहे. तुमचा स्वभाव हिंसक होणार असल्याने थोडे सावध राहा. तुमच्या जोडीदाराशी काही कारणावरून वाद होणार आहे. आरोग्याबाबत थोडे सावध राहा आणि करिअरमध्ये काही अडचणी येण्याची शक्यता आहे.
या राशीच्या लोकांसाठीही पाश्विक योग घातक ठरणार आहे. या राशीमध्ये मंगळ नवव्या घरात असणार आहे. या राशीच्या लोकांच्या वैवाहिक जीवनात अनेक अडचणी येणार आहेत. तुमच्या जोडीदाराशी अनावश्यक वाद टाळा यामुळे तुमचे नाते तुटण्याच्या मार्गावर येण्याची शक्यता आहे. खर्चात झपाट्याने वाढ होणार आहे. परदेशात जात असाल तर थोडे सावध राहा, कारण आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. काही हरवण्याची किंवा चोरीला जाण्याची शक्यता आहे. तुमचा अध्यात्माकडे अधिक कल वाढणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)