लैलाच्या फॉर्म हाऊसवर सापडले सहा सांगाडे!

अभिनेत्री लैला खान मृत्यूप्रकरणी मोठा खुलासा झालाय. पोलिसांना इगतपुरीमध्ये लैलाच्या फार्म हाऊसमध्ये सहा सापळे सापडलेत. बंगल्यातल्या टॉयलेट सेफ्टी टँकमध्ये सहा सापळे मिळाल्याचं सांगण्यात येतंय. दुपारी बारा वाजल्यापासून या बंगल्यात खोदकाम सुरू होतं.

Updated: Jul 11, 2012, 09:04 AM IST

www.24taas.com, योगेश खरे, इगतपुरी

 

अभिनेत्री लैला खान मृत्यूप्रकरणी मोठा खुलासा झालाय. पोलिसांना इगतपुरीमध्ये लैलाच्या फार्म हाऊसमध्ये सहा सापळे सापडलेत. बंगल्यातल्या टॉयलेट सेफ्टी टँकमध्ये सहा सापळे मिळाल्याचं सांगण्यात येतंय. दुपारी बारा वाजल्यापासून या बंगल्यात खोदकाम सुरू होतं.

 

आठ तासाच्या खोदकामानंतर अखेर टॉयलेट टँकमध्ये हे सापळे सापडलेत. तपासामधलं हे मोठं यश मिळालंय. तसंच एक बॅगही या सर्च ऑपरेशन दरम्यान सापडलीय. त्यामध्ये कपडे आहेत. तीन सांगाडे हे बंगल्यात तर तीन सांगाडे हे टँकमध्ये सापडले आहेत. त्यामुळे लैलाच्या हत्येचा उलगडा होण्यास मदत होणार आहे. पोलिसांनी इगतपूरी येथे रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू ठेवले होते.

 

 

एरवी थंड हवा असलेलं इगतपुरी सध्या चांगलंच तापलंय. सध्या सगळ्या देशाचं लक्ष इगतपुरीकडे लागलंय. इथेच असलेला लैला खानचा बंगला उघड करणार आहे अनेक गुपितं.... ज्यांच्यामुळे देशातल्या अनेक दहशतवादी कारवायांचा छडा लागणार आहे.

 

 

अडीचशे पोलीस, एक डझनभर पोलीस अधिकारी, फॉरेन्सिक एक्सपर्ट आणि डॉग स्क्वॉड मिळून इगतपुरीच्या फार्म हाऊसशी जुळलेले दहशतवादाचे धागेदोरे सोडवण्याचा प्रयत्न करतायत. याच बंगल्यात दिल्ली स्फोटाचा कट शिजल्याचं सांगण्यात येतंय. याच बंगल्यात डॉ. वसीम आणि लष्करच्या अतिरेक्यांनी दिल्ली स्फोटांचा कट आखला होता. त्यावेळी लैलाही तिथे उपस्थित होती. या बैठकीनंतर या बंगल्याला रहस्यमय रित्या आग लागली.

 

 

दहशतवादी कारवायांचे पुरावे मिचवण्यासाठीच ही आग लावल्याचा संशय आहे. लैला खानला बॉलीवुडमध्ये ब्रेक देणारे दिग्दर्शक राकेश सावंत या बंगल्यावर पोहोचले त्यावेळी इथे काही संशयास्पद काश्मिरी तरुण दिसले होते. त्याचबरोबर युएईमधल्या काही लोकांशीही लैलानं त्यांची ओळख करुन दिली होती. त्या लोकांबरोबर शस्त्रधारी बॉडीगार्डसही होते. या लोकांनी सावंत यांना काळा पैसा देऊन सिनेमा तयार करण्याची ऑफरही दिली होती.

 

 

आता परवेझ टाकच्या सांगण्यानुसार इगतपुरीमध्ये खोदकाम सुरू आहे. आता या खोदकामातून दहशतवादासंदर्भात अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येणार आहेत.

 

व्हिडिओ पाहा...

[jwplayer mediaid="137116"]