एप्रिल-मे मध्ये येणार 'आकाश' हाती

जगातील सगळ्यात स्वस्त असणाऱ्या आकाश टॅब्लेटचं अपग्रेडेड व्हर्जन एप्रिल किंवा मे मध्ये लाँच करण्यात येईल. आणि याच्या किमतीत वाढ करण्यात येणार नसल्याची माहिती केंद्रीय मंत्री डी. पुरंदेश्वरी यांनी आज दिली.

Updated: Feb 24, 2012, 07:25 PM IST

www.24taas.com, वडोदरा

 

जगातील सगळ्यात स्वस्त असणाऱ्या आकाश टॅब्लेटचं अपग्रेडेड व्हर्जन एप्रिल किंवा मे मध्ये लाँच करण्यात येईल. आणि याच्या किमतीत वाढ करण्यात येणार नसल्याची माहिती केंद्रीय मंत्री डी. पुरंदेश्वरी यांनी आज दिली.  आकाश टॅब्लेटची किंमत अंदाजे २,४०० ते २,५०० रु. इतकी असेल.

 

“आकाश टॅब्लेट हे पूर्णपणे देशी टॅब्लेट असून आधीच्या व्हर्जनमध्ये आढळून आलेल्या चुका नव्या व्हर्जनमध्ये दुरूस्त करण्यात आलेल्या आहेत.” असं त्या म्हणाल्या.

 

डेटाविंड या कंपनीबरोबर काही प्रॉब्लेम्स असल्यामुळे आकाश टॅब्लेट उत्पादनात डेटाविंडचा आता काही संबंध नसल्याचं केंद्रीय मनुष्यबळ मंत्री कपिल सिब्बल यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं.