कम्प्युटर गेम्समुळे वाढते हिंसकता

कम्प्युटरवर गेम खेळणाऱ्या लहान मुलांचे प्रमाण दिनसेंदिवस वाढत आहे. आपला जास्तीत जास्त वेळ ही मुलं गेम खेळण्यातच घालवतात. पण, अशी मुलं जास्त हिंसक बनू शकतात, असं नुकतंच एका संशोधनातून पुढे आलंय.

Updated: Jul 27, 2012, 02:47 PM IST

www.24taas.com, लंडन

कम्प्युटरवर गेम खेळणाऱ्या लहान मुलांचे प्रमाण दिनसेंदिवस वाढत आहे. आपला जास्तीत जास्त वेळ ही मुलं गेम खेळण्यातच घालवतात. पण, अशी मुलं जास्त हिंसक बनू शकतात, असं नुकतंच एका संशोधनातून पुढे आलंय.

 

तासनतास कम्प्युटरवर गेम खेळणाऱ्या मुलांवर नियंत्रण ठेवणं, ही पालकांसाठी एक डोकेदुखीच असते. पण आता मात्र पालकांना दक्ष राहणं गरजेचं ठरणार आहे. जास्तीत जास्त वेळ गेम खेळणाऱ्या मुलांचं हिंसक बनण्याचं प्रमाण वाढत चाललंय. ब्रिटनमधल्या शाळांनी या प्रश्नाची गंभीर दखल घेतलीय. याचंच एक कारण म्हणजे इथल्या शाळांमधली विद्यार्थ्यांची वाढती हिंसक वृत्ती... आपल्या मित्रांवरती, शिक्षकांवरती हल्ले करण्याचं प्रमाण वाढताना दिसतंय. यामध्ये पाच वर्षांच्या मुलांचाही सहभाग आहे.

 

अशा मुलांना शाळांनी घरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय घेतला आणि शाळेतून दररोज घरी जाणाऱ्या मुलांची संख्या चिंताजनक आहे. ही संख्या तब्बल १,६१,५४० इतकी आहे. २०१० ते २०११ या एका वर्षात पाच ते अकरा वयोगटातील ९० विद्यार्थ्यांना दररोज वर्गातून बाहेर काढण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आलीय. शिक्षकांच्या म्हणण्यानुसार, कम्प्युटरवर तासनतास गेम्स खेळणाऱ्या मुलांमधली हिंसकता वाढत आहे.

 

.