'प्री-पेड' ग्राहकांनाही आता मिळणार बिल

'ट्राय’ने देशभरातील प्री-पेड मोबाईल ग्राहकांना पोस्ट पेड प्रमाणेच बिल उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता टेलिकॉम कंपन्यांना आपल्या प्रीपेड ग्राहकांना त्यांच्या अकाऊंट संबंधीचं आयटमाइज बिल द्यावं लागेल.

Updated: Jan 7, 2012, 05:27 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

‘ट्राय’ने देशभरातील प्री-पेड मोबाईल ग्राहकांना पोस्ट पेड प्रमाणेच बिल उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता टेलिकॉम कंपन्यांना आपल्या प्रीपेड ग्राहकांना त्यांच्या अकाऊंट संबंधीचं आयटमाइज बिल द्यावं लागेल. हे बिल त्यांना ३० दिवसांमध्येच जास्तीत जास्त ५० रुपये आकारून द्यावं लागेल.

 

ट्रायने शुक्रवारी सांगितलं की मोबाईल कंपन्यांना आपल्या आपल्या टेरिफबद्दल ग्राहकांना पूर्ण माहिती द्यायला लागेल. ग्राहकांना सर्व्हिस सुरू करण्यापूर्वी एक किट मिळेल. यात सिम कार्ड, मोबाईल नंबर या शिवाय ग्राहकांना उपयोगी पडणारे त्यांच्या अधिकारांशी संबंधित एक लहान सिटीझन चार्टरही असेल.

 

 

यात चांगल्यासुविधा मिळत नसतील, तर ग्राहकांनी कुठे तक्रार करावी याबद्दलही माहिती असेल. ग्राहकांच्या या तक्रार निवारणासाठी एक वेब बेस्ड मॉनिटरींग सिस्टमही बनवायला सांगितली आहे. यामुळे ग्राहकांना आपण केलेल्या तक्रारींवरची कारवाई तपासू शकतील. ४५ दिवसांमध्ये या सर्व सुविधा मिळायला हव्यात असंही ‘ट्राय’ने सांगितलं आहे.