फनबुकची मजा लुटा अवघ्या ६४९९ रुपयात

अत्यंत स्पर्धात्मक किंमतीत मोबाईल फोनमध्ये अनेकविध फिचर्स उपलब्ध करुन देऊन अल्पावधीत बाजारपेठ काबिज करणाऱ्या मायक्रोमॅक्सने आता टॅबलेट पीसीच्या क्षेत्रात मुसंडी मारायचं ठरवलं आहे. मायक्रोमॅक्सने अवघ्या ६४९९ रुपयात फनबूक बाजारात आणली आहे.

Updated: Apr 3, 2012, 05:34 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

अत्यंत स्पर्धात्मक किंमतीत मोबाईल फोनमध्ये अनेकविध फिचर्स उपलब्ध करुन देऊन अल्पावधीत बाजारपेठ काबिज करणाऱ्या मायक्रोमॅक्सने आता टॅबलेट पीसीच्या क्षेत्रात मुसंडी मारायचं ठरवलं आहे. मायक्रोमॅक्सने अवघ्या ६४९९ रुपयात फनबूक बाजारात आणली आहे.

 

शिक्षण क्षेत्राला डोळ्यासमोर ठेऊन काढलेल्या या फनबूकची निर्मिती कंपनीच्या हरिद्वारच्या कारखान्यात केली जाणार आहे. हरिद्वार इथे महिन्याला एक लाख युनिट निर्मितीची क्षमता असल्याचं तसंच त्या वाढ करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं कंपनीचे सीईओ दीपक मेहरोत्रा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. फनबूक अँड्रोईड ४.०.३ आईस क्रिम सँडविच फ्लॅटफॉर्मवर आधारीत असून त्यात १.२२ जीएचझेड प्रोसेसर, ०.३ एमपी व्हीजीए फ्रंट कॅमेरा, चार जीबी इंटरनल मेमरी ज्यात ३२ जीबी पर्यंत वाढ करता येऊ शकेल अशा फिचर्सचा समावेश आहे. कंपनीने पीअरसन आणि एवरॉनबरोबर भागीदारी करार केला आहे ज्यामुळे शैक्षणिक कन्टेन्ट टॅबलेट पीसीवर उपलब्ध होणार आहे. यासाठी फक्त ७९९ रुपयांचे शुल्क मोजावे लागणार आहे.

 

पीअरसन आणि एवरॉन विविध शैक्षणिक संस्थांमध्ये फनबूक टॅबलेटच्या विक्रीसाठी हातभार लावतील असं कंपनीचे म्हणणं आहे. याआधी एचसीएल इन्फोसिस्टिम्स आणि विशटेल कंपन्यांनी शैक्षणिक क्षेत्राला डोळ्यासमोर ठेऊन टॅबलेट पीसीची निर्मिती केली आहे. आता त्या पंक्तीत मायक्रोमॅक्स जाऊन बसली आहे. सरकारने अत्यंत अल्प किंमतीतल्या आकाशची निर्मिती केली आहे त्यापाठोपाठ खाजगी क्षेत्रातल्या कंपन्यांना विविध शैक्षणिक संस्थांबरोबर सहकार्य करार करुन मल्टीमीडिया कन्टेन्ट मुलांना उपलब्ध करुन देत आहेत.