'फेसबुक'पासून दोन हात दूरच राहा....

फेसबुक म्हणजे हजारो दिलो कि धडकन अशीच गोष्ट झाली आहे. मात्र आता हेच फेसबुक धोकादायक ठरतं आहे. त्यामुळे यापासून सावध राहण्याचा इशारा दिला जातो आहे.. मात्र आपण किती सावध असतो हे आपल्याला चांगलचं माहिती आहे.

Updated: Aug 5, 2012, 01:46 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

फेसबुक म्हणजे हजारो दिलो कि धडकन अशीच गोष्ट झाली आहे. मात्र आता हेच फेसबुक धोकादायक ठरतं आहे. त्यामुळे यापासून सावध राहण्याचा इशारा दिला जातो आहे.. मात्र आपण किती सावध असतो हे आपल्याला चांगलचं माहिती आहे. अगदी शाळेतील विद्यार्थ्यांपासून ते थेट वृद्धांपर्यंत प्रत्येकाचे प्रोफाईल आपल्याला फेसबुकवर दिसतात. एका क्लिकवर मित्र-मैत्रिणीला शोधता येते.

 

फ्रेंड रिक्वेस्ट टाकून नवीन मित्र-मैत्रिणी जोडता येतात. कोणत्याही ओळखीशिवाय हळूहळू हे फ्रेंड सर्कल कधी मोठे होते हे समजतही नाही. शाळा, महाविद्यालयातील मित्र, नातेवाईकांच्या संपर्कात राहण्याबरोबर प्रेमाच्या आणाभाका, रुसवे फुगवे दूर करण्याकरिता फेसबुक हे उत्तम माध्यम मानले जाते तसा त्याचा वापरही होतो. अनेकांनी तर आपल्या आयुष्याचा जोडीदारही फेसबुकवरूनच पसंत केल्याची उदाहरणे आहेत.

 

त्यामुळे फेसबुक, मॅट्रोमोनियल साईटस् सर्वांना हव्याहव्याशा वाटतात. आज लाखो तरुण-तरुणी या वेबसाईटस्चे युजर्स आहेत. असे असले तरी यामध्ये विश्‍वासाहर्ता काहीच नसल्याने काही तरुण या साईटस्चा गैरवापर करून सुशिक्षित व चांगल्या ठिकाणी नोकरी करणार्‍या तरुणींना टार्गेट करीत आहेत. मागील काही दिवसांमध्ये अशा फसवणुकीच्या घटना वाढल्याचे उघडकीस आले आहे.