'फेसबुक' आता मराठीमध्येही!

भारतीय फेसबुक युजर्सना आता आपल्या मातृभाषेत फेसबुक अ‍ॅक्सेस करण्याची संधी मिळणार आहे. कारण, मोबाइलमध्ये आठ भारतीय भाषांमध्ये फेसबुक अ‍ॅक्सेस करण्याची सुविधा फेसबुक सुरू करणार आहे. येत्या काही आठवड्यांतच ही सुविधा मोबाइल्सवर सुरू होईल.

Updated: Apr 4, 2012, 11:21 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

भारतीय फेसबुक युजर्सना आता आपल्या मातृभाषेत फेसबुक अ‍ॅक्सेस करण्याची संधी मिळणार आहे. कारण, मोबाइलमध्ये आठ भारतीय भाषांमध्ये फेसबुक अ‍ॅक्सेस करण्याची सुविधा फेसबुक सुरू करणार आहे. येत्या काही आठवड्यांतच ही सुविधा मोबाइल्सवर सुरू होईल.

 

फेसबुकचे कंट्री ग्रोथ मॅनेजर केविन डिसुझा म्हणाले, “ आज ५ कोटीहून अधिक भारतीय लोक फेसबुक वापरतात. एवढ्या मोठ्या संख्येने फेसबुक पाहाणाऱ्या मोबाइलवर फेसबुक पाहाण्याचा आणखी चांगला अनुभव मिळावा, या साठी मोबाइलवर फेसबुक ८ भारतीय भाषांमध्ये सुरू करण्यात येत आहे.” यामुळे कुठल्याही इंटरनेट अ‍ॅक्सेस उपलब्ध असणाऱ्या मोबाइल फोनमधून हिंदी, मलय आणि व्हिएतनमीज या तीन राष्ट्रीय भाषांमधून तर मराठी, गुजराथी, तामिळ, मल्याळम, कन्नड, पंजाबी आणि बंगाली या प्रादेशिक भाषांमधूनही फेसबुक वापरता येणार आहे.

 

पूर्वी, फेसबुक फक्त इंग्रजीमध्ये वापरता येत होतं. मात्र, आता भारतीय भाषांमध्येह ते वापरता येईल. हे अ‍ॅप्लिकेशन जुलै २०११मध्ये लाँच करण्यात आलं होतं. जगभरातील जवळपास ३६०० जावा-एम्बेडेड मोबाइल्समधून हे अ‍ॅप्लिकेशन वापरता येईल.

 

भारत हे फेसबुकसाठी जगातील द्वितीय क्रमांकाचे मार्केट आहे. अमेरिकेनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर फेसबक वापरणारे लोक भारतातच आहेत. ३१ डिसेंबर २०११ रोजी पाहाण्यात आलेल्य़ा नोंदणीनुसार फेसबुकवर दर महिन्याला ४,६०,००,००० भारतीय युजर्स हजेरी लावतात. ही संख्या २०१० मधील संख्येहून १३२ टक्क्यांनी वाढलेली होती. सध्या ८ कोटी लोक महिनाभर फेसबुकवर येत असतात. त्यातील ३ कोटी ५० लाख वापरकर्ते मोबाइलवरून फेसबुक अ‍ॅक्सेस करत असतात.