‘आकाश’साठी पाहावी लागणार वाट!

www.24taas.com, नवी दिल्ली जगातील सर्वात स्वस्त टॅब असलेल्या ‘आकाश’ अपग्रेड व्हर्जनसाठी आता तुम्हांला पुढील मार्चपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. आकाशचा (युबीस्लेट 7+) जानेवारी-फेब्रुवारीचा स्टॉक आत्ताच संपला असल्याने आता ग्राहकांना मार्चपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.

Updated: Jan 4, 2012, 10:22 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

जगातील सर्वात स्वस्त टॅब असलेल्या ‘आकाश’ अपग्रेड व्हर्जनसाठी आता तुम्हांला पुढील मार्चपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. आकाशचा (युबीस्लेट 7+) जानेवारी-फेब्रुवारीचा  स्टॉक आत्ताच संपला असल्याने आता ग्राहकांना मार्चपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.
आकाशची गेल्या आठवड्यात ऑनलाईन बुकिंग अगदी जोरात झाली. फक्त १४ दिवसात १४ लाख बुकिंग या टॅबलेटसाठी झाली. जेव्हा पासून या टॅबलेटची वेबसाईट सुरू झाली तेव्हापासून याच्या बुकिंगमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

 

आकाश टॅबलेटच्या ऑनलाइन वेबसाईट ही  १५ डिसेंबर २०११ पासून सुरू झाली. या आकाश टॅबलेटची किंमत ही २४९९ रूपये इतकी आहे. तसचं यासोबत या ऑनलाइन बुकिंगचं शिपिंग शुल्क हे १९९ रूपये जादा द्यावा लागणार आहे. पण तुम्हांला हा टॅबलेट कॅश पेमेंट  करून सुद्धा घेता येईल.

 

सात इंच स्क्रिन असणाऱ्या या टॅबलेटचा रॅम २५६ मेगाबाइट आहे. एआरएम ११ प्रोसेसर सोबत एड्रॉयड २.२ ऑपरेटिंग सिस्टम सुद्धा मिळेल. दोन यूएसबी पोर्ट आणि एचडी सोबत व्हिडिओची सुद्धा सुविधा मिळणार आहे. आकाशच्या या टॅबलेटची बॅटरीची क्षमता ही जवळजवळ दीड तास आहे.