शिवाली परब पाठोपाठ 'हास्यजत्रा' फेम अभिनेत्याने बांधला अलिशान बंगला; पाहा Inside फोटो

नुकतंच प्रथमेशने त्याच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिलीये. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रथमेशने त्याच्या चाहत्यांना गुडन्यूज दिलीये. 

Updated: May 21, 2024, 03:25 PM IST
शिवाली परब पाठोपाठ 'हास्यजत्रा' फेम अभिनेत्याने बांधला अलिशान बंगला; पाहा Inside फोटो title=

मुंबई : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून घरा-घरात पोहचलेला प्रथमेश शिवलकर हा एक अशा कलाकरांपैकी एक आहे. ज्याला हास्यजत्रा कार्यक्रमाने हक्काच व्यासपीठ देवून स्वत:ची वेगळी ओळख दिली आहे. या कार्यक्रमातून अनेक कलाकारांना व्यासपीठ मिळालं आहे. यातलंच एक नाव म्हणजे, प्रथमेश शिवलकर. आज प्रथमेशचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. प्रथमेश चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. नुकतंच प्रथमेशने त्याच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिलीये. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रथमेशने त्याच्या चाहत्यांना गुडन्यूज दिलीये. 

अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर त्याने मराठी कलाविश्वात स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. नुकतंच प्रथमेशने एक घर बांधलंय. ज्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत प्रथमेशने कॅप्शनमध्ये लिहीलंय की, यांजसाठी केला होता अट्टाहास भाग २: शिवार्पण शहरापासून दूर हक्काची एक वास्तु असावी; जिथे निर्मळ शांतता अनुभवता यावी…मातीच्या सुगंधाने दरवळत रहावा तिथला प्रत्येक क्षण;अशीच स्वप्नातली वास्तु झाली साकारनाव तिचे ''शिवार्पण''ज्या वास्तुत आपण लहानाचे मोठे होतो , त्या वास्तुला जेव्हा मोठं करण्याची संधी आपल्याला मिळते... तेव्हा त्या वास्तुचे ऋण फेडण्याचा केलेला छोटा प्रयत्न म्हणजेच...'' शिवार्पण'' हक्काचं शेतघर यांजसाठी केला होता अट्टाहास Series to be continue… असं कॅप्शन प्रथमेशने या पोस्टला दिलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

प्रथमेशच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीने कमेंट करत लिहीलंय की, खूप अभिनंदन… यशाची कमान अशीच उंचावत ठेव… तर अजून एकाने लिहीलंय, मेहनत, आत्मविश्वास, सातत्य, प्रामाणिकपणा!!!! Proud! तर अजून एकाने लिहीलंय, भावा मेहनतीच फळ. तर अजून एकाने म्हटलंय, अभिनंदन मराठी मुलं अशीच मोठी व्हावीत. तर अजून एकाने लिहीलंय, Heartly अभिनंदन, पण ज्याच्यामुळे मिळाले ते विसरू नका , हास्य जत्रा.... आम्हाला अजून खूप episode मद्धे पाहणे आहे तुम्हाला. अशा अनेक प्रकारच्या कमेंट युजर्स या पोस्टवर करत आहेत. अभिनेत्याची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याआधी प्रथमेशने गाडी घेतली होती.