उजेड दूर करतो हृदयविकाराचा धोका

शास्त्रज्ञांनी हृदरोगावर नवा उपाय शोधून काढला आहे. शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की जास्त प्रकाश हृदरोगापासून बचाव करतो. शास्त्रज्ञांचं मत आहे, की मानवी शरीराच्या जैविक घड्याळाचा संबंध उजेड अंधाराशी असतो. हे जैविक घड्याळ मेंदुतील प्रथिनांमुळे निश्चित होत असते.

Updated: Apr 29, 2012, 07:07 PM IST

www.24taas.com, कोलोरॅडो

 

शास्त्रज्ञांनी हृदरोगावर नवा उपाय शोधून काढला आहे. शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की जास्त प्रकाश हृदरोगापासून बचाव करतो.

 

कोलोरॅडो युनिव्हर्सिटीच्या एका अभ्यास दलाचे प्रमुख असणाऱ्या प्रोफेसर टोबाइस एकले यांनी म्हटलं, “जास्त प्रकाश किंवा सकाळचं ऊन अंगावर घेतल्यास हृदरोगाचा धोका कमी होतो. हॉस्पिटलमध्ये आम्ही रुग्णांना प्रकाश मिळेल अशीच व्यवस्था असावी” शास्त्रज्ञांचं मत आहे, की मानवी शरीराच्या जैविक घड्याळाचा संबंध उजेड अंधाराशी असतो. हे जैविक घड्याळ मेंदुतील प्रथिनांमुळे निश्चित होत असते.

 

नेचर मेडिसिन जर्नलनुसार पिरीयड २ नामक प्रोटिन हृदयविकाराच्या झटक्यांपासून दूर ठेवतं, हृदयविकाराचा झटका आल्यावर हृदयाला ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. अशा वेळी अनेक पेशी मरतात. त्यामुळे हृदयाचं नुकसान होतं. उजेडामुळे पिरीयड -२ हे प्रोटिन शरीरात होण्यास मदत मिळते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.