www.24taas.com, नवी दिल्ली
लंडनमध्ये भारताला सर्वाधिक अपेक्षा असणार ते शुटिंगमध्ये... अथेन्समध्ये राज्यवर्धन सिंग राठोड आणि बीजिंगमध्ये अभिनव बिद्रानं मेडल पटकावलेय. आता लंडनमध्ये तब्बल ११ शूटर्स सुवर्णवेध घेण्यासाठी सज्ज आहेत.
या अकरा शूटर्सवर कोट्यावधी भारतीयांच्या आशा केंद्रीत झाल्या आहेत. जागतिक स्पर्धा गाजवणा-या भारतीय शूटर्सकडून यावेळी अथेन्स आणि बीजिंगपेक्षा चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
ऑलिंपिक गोल्ड मेडल विनर अभिनव बिंद्रा हा पुन्हा एकदा लंडनमध्ये मेडल मिळवण्यासाठी सज्ज आहे... लंडन ऑलिंपिकसाठी सर्वात अगोदरक्वालिफायिंग मिळवणारा गगन नारंग तीन इव्हेंटमध्ये मेडल्ससाठी लक्ष्याचा वेध घेईल... तर जागतिक नेमबाजीत अव्वल स्थान पटकावलेल्या आणिवर्ल्ड चॅम्पियन असलेल्या रंजन सिंग सोधीकडून डबल ट्रॅपमध्ये मेडल्सच्या अपेक्षा असणार आहेत.... ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राची एकमेव महिलाप्लेअर राही सरनोबत 25 मीटर स्पोर्टल पिस्तुल प्रकारात जगभरातील अव्वल स्पर्धकांशी मेडल्ससाठी झुंज देईल... तर माजी वर्ल्ड चॅम्पियनमानवजित सिंग संधू आणि शगुन चौधरी ट्रॅप प्रकारात आपलं कौशल्य पणास लावतील. २००९ च्या वर्ल्ड कपमध्ये सिल्व्हर मेडल मिळवलेला विजय कुमार २५ मीटर रॅपिड फायर पिस्तुल प्रकारात आणि दोहा एशियन गेम्समध्ये ब्राँझ मेडलपटकावलेला संजीव राजपूत हा ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये मेडल्ससाठी झुंज देतील. तर 2011च्या वर्ल्ड चॅम्पियनमध्ये सिल्व्हर मेडललागवसणी घातलेली अन्नू राज सिंगही दोन इव्हेंटमध्ये मेडल्ससाठी टार्गेच अचूक हिट करण्याचा प्रयत्न करेल... १० मीटर एअर पिस्तुल आणि ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात सहभागी होणारे अनुक्रमे हिना सिद्धू आणि जॉयदीप कर्माकार यांना ऑलिम्पिकला थेट क्वालिफाय होता आले नसले, तरीगेली दोन वर्ष त्यांच्या कामगिरीत सातत्य आहे.
२००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्राने१० मीटर एअर रायफलमध्ये गोल्ड मेडल पटकावताना भारताच्या ऑलिंपिक इतिहासातील एकमेव वैयक्तिक गोल्ड मेडल पटकावण्याची किमया साधली होती...त्यानंतर भारतीय शूटर्सनी जागतिक शूटिंगमध्ये आपला ठसा उमटवला...त्यामुळे लंडनमध्ये नेमबाजांकडून भारताला मेडल्सच्या सर्वाधिक आशा आहेत. नेमबाजीतीले हे अकरा शिलेदार आता लंडन ऑलिम्पिकमध्ये किती मेडल्सचा 'वेध' घेतात याकडेच कोट्यावधी भारतीयांचं लक्ष लागून राहिल आहे.