'कतार ओपन'मध्ये नादाल पराभूत

दोहा येथे सुरू असलेल्या कतार ओपनच्या सेमी फायनलमध्ये फ्रेंच खेळाडू गेल मॉन्फिल्सने राफाएल नादालचा ६-३, ६-४ अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला.

Updated: Jan 7, 2012, 08:09 PM IST

www.24taas.com, कतार

 

दोहा येथे सुरू असलेल्या कतार ओपनच्या सेमी फायनलमध्ये फ्रेंच खेळाडू गेल मॉन्फिल्सने राफाएल नादालचा ६-३, ६-४ अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. तर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये स्विस प्लेअर रॉजर फेडररने दुखापतीमुळे माघार घेतल्याने जो विल्फ्रेड त्सोंगाला सहज फायनल गाठता आली. मॉन्फिल्स-त्सोंगा लढतीमुळे कतार ओपनमध्ये प्रेक्षकांना ऑल फ्रेंच फायनल पाहायला मिळणार आहे.

 

गेल मॉन्फिल्स विरूद्ध राफाएल नादाल सेमी फायनलपूर्वी नादालचंच पारडं जड मानलं जातं होतं. याआधी या दोघांमध्ये झालेल्या मॅचेसमध्ये नादालने ८ विरूद्ध १ अशी बाजी मारली होती. पण मॉन्फिल्सने प्रत्यक्ष मॅचमध्ये कमाल दाखवत ओपनिंग सेट सहज जिंकत रोमांचक अशा सेकंड सेटमध्ये ४-१ ने पिछाडीवर पडलेल्या मॉन्फिल्सने कमबॅक करत बरोबरी साधली. या सेमी फायनलमध्ये नादालला सूरच सापडला नाही. मॉन्फिल्सने सलग १८ सर्व्हिस करत नादालची दमछाक केली. नादालने प्रत्यक्षात मॅचमध्ये बऱ्याच चुका केल्या. दरम्यान नादालने दोन मॅच पॉईंट्स वाचवले. पण मॉन्फिल्सने नादालच्या चुकीचा फायदा उचलत पॉईंट्सची कमाई केली.

 

या सेमी फायनलमध्ये दोन्ही प्लेअर्सनी दमदार खेळ करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. अखेर मॉन्फिल्सने बाजी मारत कतार ओपनच्या फायनलमध्ये धडाक्यात प्रवेश केला. फायनलमध्ये मॉन्फिल्सची गाठ पडणार आहे ती त्याचा मित्र जो विल्फ्रेड त्सोंगाशी. फेडररने दुखापतीमुळे माघार घेतल्याने त्सोंगाला फायनलकरता बाय मिळाला होता.