www.24taas.com, विनीत डंभारे, कीव्ह
युरो कप २०१२ सुरू व्हायला अवघे काही तास उरले आहेत. पोलंड आणि युक्रेनमध्ये तर प्रत्येक युरो कपच्या तयारींवर शेवटचा हात फिरवला जातो आहे. या सर्व धामधुमीत युरो कपच्या प्रत्येक मॅचआधी त्या मॅचचं भविष्य वर्तवण्याकरता 'ख्र्याक द पिग' तयारीला लागला आहे. २०१० द.आफ्रिकेत पार पडलेल्या फूटबॉल वर्ल्ड कप दरम्यान पॉल ऑक्टोपसने प्रत्येक मॅचचा अचूक रिझल्ट सांगितला होता. २०१० द.आफ्रिकेत झालेला वर्ल्ड कपमध्ये स्पॅनिश टीमने जरी जिंकला असला, तरी त्या वर्ल्ड कपला सर्वाधिक लोकप्रिय ठरला होता तो प्रत्येक मॅचचं अचुक भविष्य वर्तवणाऱ्या पॉल ऑक्टोपसने.
संपुर्ण वर्ल्ड कप दरम्यान पॉल ऑक्टोपसने सांगितलेलं प्रत्येत भविष्य खरं ठरलं होतं. आता पोलंड आणि युक्रेनमध्ये यावर्षी होणाऱ्या युरो कपकरता प्रत्येक मॅचपुर्वी अचुक भविष्य सांगण्याकरत 'ख्र्याक' नावाचा डुक्कर रेडी झाला आहे. युरो कप दरम्यान 'ख्र्याक'ची खास बडदास्त ठेवण्यात येणार आहे. युरो कप सुरू होण्यापुर्वी 'ख्र्याक' या डुकराची व्यवस्था युक्रेनची राजधानी कीव्ह येथे करण्यात आली आहे. याच ठिकाणी युरो कपची फायनल पार पडणार आहे. 'ख्य्राक'च्या या अचंबित करणाऱ्या शक्तीमुळे फुटबॉल चाहत्यांनी त्याला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
त्यामुळे 'ख्र्याक'करता वेगळी सुरक्षाव्यवस्थाही करण्यात आली आहे. ख्र्याकची काळजी घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी ख्र्याकच्या या अकल्पित अशा शक्तीचा युरो कपकरता वापर करण्याचं ठरवलं आहे. २०१२ युरो कप सुरू होण्यापुर्वी त्या टूर्नामेंटच्या प्रत्येक मॅचचं भविष्य सांगण्याकरता सध्या अनेक सायकिक प्राण्यांचं नावं पुढे येतंय. पोलंडमधील क्रॅकोव्ह येथे सिट्टा नावाचा हत्ती प्रत्येक मॅचपुर्वी त्या मॅचचा विजेता कोण असणार,याचं भवितव्य वर्तवणार आहे. टेलिपथीद्वारे अचुक भविष्य सांगणारा 'ख्य्राक' नावाचा डुक्कर प्रत्येक मॅचपुर्वी फॅन्सच्या उपस्थितीत भविष्य वर्तवणार आहे. त्यामुळे युक्रेनमध्ये सध्या सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. ते ख्र्याक टूर्नामेंटदरम्यान किती अचूक ठरतो त्याकडे.