'सचिनच्या महाशतकामुळेच माझा विजय'

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या महाशतकाने भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल चांगलीच प्रेरित झाली. आणि या महाशतकाने प्रेरित होऊन तिने स्विस ओपन फायनलमध्ये बाजी मारली.

Updated: Mar 21, 2012, 10:42 AM IST

www.24taas.com, बेर्ने

 

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या महाशतकाने भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल चांगलीच प्रेरित झाली. आणि या महाशतकाने प्रेरित होऊन तिने स्विस ओपन फायनलमध्ये बाजी मारली.

 

'जेव्हा सचिनने शतकाचं शतक पूर्ण केलं तेव्हा मी स्विझर्लंडमध्ये सेमीफायनल खेळत होती. मला त्या महाशतकाने फारच प्रेरणा मिळाली, आणि मी स्वत:ला बजावलं की, मलाही चांगलं प्रर्दशन करायचे आहे. मी सुद्धा फायनल जिंकू शकते, आणि तसचं झालं, त्या दिवशी मला खूपच स्फूर्ती मिळाली ती म्हणजे सचिन तेंडुलकर यांच्यामुळे', असं म्हणणं स्विस ओपन विजेती सायना नेहवाल.

 

तसचं तिने म्हटलं की, 'हा एक ऐेतिहासिक क्षण आहे. सचिनचे महाशतक पाहणं ही एक पर्वणीच आहे, मला वाटत नाही की, त्याला आता आणखी काही करून दाखवण्याची गरज आहे'. सायनाने फायनलमध्ये चीनच्या तिसऱ्या मानांकित शियान वैंग ला २१-१९, २१-१६ अशा सरळ सेटमध्ये पराभूत केलं. जेव्हा सायनाला विचारण्यात आलं की, तेंडुलकरला भारतरत्न दिलं पाहिजे का? यावर सायना म्हणते की, 'गेल्या वर्षभरापासून माझं म्हणणं आहे की, सचिन भारतरत्नाचे खरे हकदार आहेत. माझ्या साठी ते भारतरत्नच  आहेत'.