फेडररचा विजय.. शारापोव्हाचा पराजय

इंडियाना वेल्सच्या मेन्सचं जेतेपद स्विस प्लेअर रॉडर फेडररने मिळवलं आहे. तर वुमन्स सिंगल्समध्ये वर्ल्ड नंबर वन विक्टोरिआ अझारेंकाने रशियन ग्लॅमर गर्ल मारिया शारापोव्हाचा ६-२, ६-३ अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत यावर्षीच्या चौथ्या विजेतेपदाला गवसणी घातली.

Updated: Mar 19, 2012, 08:06 PM IST

www.24taas.com, न्यूयॉर्क

 

इंडियाना वेल्सच्या मेन्सचं जेतेपद स्विस प्लेअर रॉडर फेडररने मिळवलं आहे. तर वुमन्स सिंगल्समध्ये वर्ल्ड नंबर वन विक्टोरिआ अझारेंकाने रशियन ग्लॅमर गर्ल मारिया शारापोव्हाचा ६-२, ६-३ अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत यावर्षीच्या चौथ्या विजेतेपदाला गवसणी घातली. अमेरिकेत झालेल्या इंडियाना वेल्स टूर्नामेंटच्या वुमन्स सिंगल्स फायनलमध्ये प्रेक्षकांना अझारेंका-शारापोव्हा यांच्यातली रंगतदार मॅच पाहण्याची अपेक्षा होती.

 

मात्र वर्ल्ड चॅम्पियन अझारेंकाने रशियन मारिया शारापोव्हाला ६-२, ६-३ अशा सरळ सेट्समध्ये सहजपणे १ तास १६ मिनिटांत पराभूत केलं. ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन असणाऱ्या अझारेंकाने फायनलच्या सुरूवातीलाच दोनदा शारापोव्हाची सर्विस ब्रेक केली. सेकंड सेटमध्येही शारापोव्हा आपला प्रभाव पाडण्यात अपयशी ठरली. सेकंड सेटमध्येही अझारेंकाने तब्बल चारवेळा तिची सर्विस भेदली. पहिल्या सेटमध्ये निष्प्रभ ठरलेल्या शारापोव्हाने सेकंड सेटमध्ये मात्र अझारेंकाला थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.

 

अझारेंकाने आपल्या जबरदस्त बॅकहॅण्डच्या जोरावर शारापोव्हाची झुंज मोडीत काढत जेतेपदावर नाव कोरलं. २२ वर्षीय बेलारूसीयन अझारेंकाने आतापर्यंत खेळलेल्या २३  मॅचेस जिंकल्या आहेत. याआधी सर्वाधिक सलग ३७ WTA  मॅचेसच्या विजयाची नोंद स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीसच्या नावावर १९९७ साली झाली आहे.