www.24taas.com, नवी दिल्ली
सायना नेहवालनं चीनच्या जुएरूई ली ला 21-13, 20-22,19-21 नं पराभूत करत इंडोनेशिया ओपन सुपर सीरिजचं अजिंक्यपद पटकावले आहे.
सायनाचं इंडोनेशिया ओपनचं तिसरं विजेतेपद ठरलं. या आधी सायनानं 2009 आणि 2010 मध्ये विजेतेपद पटकावलं होतं. 2011 मध्ये तिला उपविजेतेपदावर समाधाना मानाव लागलं होतं. मात्र, यावेळेस ती आपल्या शानदार खेळानं इंडोनेशिया नओपनची चॅम्पियन ठरली. दरम्यान, 2012 सीझनमधील सायनाचं हे तिसरं अजिंक्यपद ठरलं आहे.
सायना नेहवालनं इंडोनेशिया ओपनच्या फायनलमध्ये धडक मारल्याने अपेक्षा उंचावल्या होत्या. सायनानं कोरियाच्या सुंग जी ह्युंगचा २२-२०, २१-१८ नं धुव्वा उडवला. सायनाच्या धडाक्यापुढे सुंगचं काहीच चाललं नाही. पहिल्या सेटमध्ये आघाडी घेतल्यावर सुंगनं जोरदार कमबॅक केला. मात्र, शेवटी सायनाच्या अनुभवामोर सुंगला नतमस्तक व्हायला लागला. दोन लीग मॅचेसमध्ये आणि क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये भारताच्या या शटलर क्वीनला विजयासाठी चांगलचं झगडाव लागलं. मात्र, सेमी फायनलची मॅच तिनं आरामात जिंकली.