स्पेनचा स्पीड 'भन्नाट', विजयाचा त्यांना 'नाद'

2008 युरो चॅम्पियन, 2010 वर्ल्ड कप विजते आणि आता पुन्हा युरो चॅम्पियन बनण्याच्या दिशेने स्पेनची विजयी वाटचाल सुरू आहे.. शेवटच्या लीग मॅचमध्ये स्पेनने क्रोएशियाचं तगडं आव्हान मोडीत काढत 1-0 या विजयासह क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळवला..

Updated: Jun 19, 2012, 09:03 AM IST

www.24taas.com, गॅडक्स

 

2008 युरो चॅम्पियन, 2010 वर्ल्ड कप विजते आणि आता पुन्हा युरो चॅम्पियन बनण्याच्या दिशेने स्पेनची विजयी वाटचाल सुरू आहे.. शेवटच्या लीग मॅचमध्ये स्पेनने क्रोएशियाचं तगडं आव्हान मोडीत काढत 1-0 या विजयासह क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळवला.. पॉईंट टेबलमध्ये टॉपवर असणा-या स्पेनकरता ज्युस नवासने विजयी गोल लगावला.. स्पेनने आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करताना क्रोएशियाचं तगडं आव्हान शेवटच्या लीग मॅचमध्ये मोडीत काढत, दुस-या विजयाची नोंद केली..

 

संपुर्ण मॅचमध्ये तोडीस तोड कामगिरी करणा-या क्रोएशियाचा, मॅचच्या अखेरच्या काही मिनीटांमध्ये डिफेंस वीक पडला...आणि याच संधीचा अचुक फायदा घेत ज्युस नवासने स्पेनकरता विजयी गोल लगावला... क्वार्टर फायनल प्रवेशाचं स्वप्न उराशी बाळगून वर्ल्ड चॅम्पियन स्पेनविरूद्ध खेळण्यासाठी उतरलेल्या क्रोएशियाने केवळ स्पेनचं आक्रमणंच थोपवलं नाही..तर प्रतिहल्ला चढवत स्पेनला अनेकदा नामोहरमही केलं...

 

या संपुर्ण मॅचमध्ये दोन्ही टीम्सच्या डिफेंस आणि गोलकीपरचा कस लागला...फर्स्ट हाफ बरोबरीत सुटल्यानंतर, सेकंड हाफमध्येही जवळपास असंच चित्र दिसत होतं.. मात्र मॅचच्या अखेरच्या काही मिनीटांमध्ये चित्रं पालटलं आणि आंद्रे इनिएस्ताच्या पासवर सबस्टिट्यूट म्हणुन आलेल्या ज्युस नवासने क्रोएशियन गोलकीपर प्लेटिकोसाला चकवत 88व्या मिनीटाला स्पेनकरता विजयी गोलची नोंद केली...या विजयासह ग्रुप सी पॉईंट टेबलमध्ये टॉपवर असणा-या स्पेनसमोर, क्वार्टर फायनलमध्ये ग्रुप डी मधील उपविजेत्या टीमचं आव्हान असणार आहे...