www.24taas.com, धरमशाला
सचिन तेंडुलकर भारतरत्नच्या योग्यतेचा आहेच, पण त्याच्याआधी महान हॉकीपटू ध्यानचंद यांना भारतरत्न दिलं जावं, अशी इच्छा व्यक्त केली आहे ती माजी क्रिकेट कर्णधार महंम्मद अझरुद्दिन याने.
“सचिनला भारतरत्न मिळायला हवं. याबद्दल कुठलंच दुमत नाही. पण महान हॉकीपटू ध्यानचंद हेच भारतरत्न मिळवणारे पहिले खेळाडू ठरावेत, असं मला वाटतं”, असं अझरुद्दिन म्हणाला.
“ध्यानचंद स्वातंत्र्यपूर्व काळात हॉकी खेळले होते. ते ही हॉकीचं योग्य शिक्षण मिळत नसताना, खेळण्यासाठी चांगली हॉकी स्टिक नसताना. त्यावेळी तर हॉकीची योग्य मैदानंही नव्हती. अशा काळात आणि परिस्थितीत ध्यानचंद यांनी संपादन केलेला विजय लक्षात घेतला, तर जाणवतं की ध्यानचंद हे महान खेळाडू होते आणि त्यांनाच आधी ‘भारतरत्न’ मिळावं.” असंही अझरुद्दिन म्हणाला.