कांगारूंची चौथी विकेट

Updated: Dec 28, 2011, 11:39 AM IST

झी २४ तास वेब टीम, मेलबर्न

ऑस्ट्रेलियाने चौथी विकेट गमावली आहे. इशांत शर्माच्या बॉलिंगवर मायकल क्लार्क अवघी १ रन काढून तंबूत परतला.  उमेश यादवने पुन्हा आपल्या बॉलिंगची कमाल दाखवत   शॉन मार्शला ३ रन्सवर आऊट केले आहे.  वॉर्नरप्रमाणेच मार्शलाही उमेशने क्लीन बोल्ड केलं . याआधी उमेशनेच  कोवेन आणि वॉर्नर या दोन महत्त्वाच्या विकेट मिळवल्या. डेव्हिड वॉर्नर ५ रन्सवर क्लीन बोल्ड झाला. त्यानंतर एड कोवेनलाही उमेशनेच पायचित केले.  रिकी पॉन्टिंग आणि मायकल क्लार्क बॅटिंग करत आहेत.

 

मॅचचा LIVE स्कोर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.

 

बॉक्सिंग-डे टेस्ट मॅचमध्ये टीम इंडिया २८२ रन्सवर ऑलआऊट झाली आहे. कांगारुंना ५१ रन्सची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली आहे. बेन हिलफेनहॉसच्या फास्ट बॉलिंगची जादू  चांगलीच चालली. त्यानं भारतीय बॅट्समनना रन्स काढण्याची कुठलीही संधी दिली नाही. त्यांना मॅचमध्ये सर्वाधिक पाच विकेट्स घेण्याची किमया केली.  भारताकडून सचिन तेंडुलकरनं ७३ केले. तर सेहवागनं ६७ रन्सची इनिंग खेळली. सचिन आणि सेहवागची सेंच्युरी हुकली तरी द्रविड यावेळी सेंच्युरी करेल अशी आशाही फोलच ठरली. मात्र, द्रविडने ६८ रन्सवर आऊट झाला.  या तिंघांव्यतिरिक्त भारताच्या एकाही बॅट्समनला फारशी कमाल करता आली नाही.  बॅट्समनच्या खराब कामगिरीमुळे टीम इंडियानं मेलबर्न टेस्टवर मजबूत पकड मिळविण्याची संधी गमावली. आता टेस्टमध्ये कमबॅक करण्यासाठी टीम इंडीयाला चांगलेच कष्ट करावे लागणार आहेत.

 

कांगारुंच्या ३३३ रन्सचा पाठलाग करण्यासाठी उतरलेले गंभीर आणि सेहवाग पुन्हा एकदा चांगली ओपनिंग करुन देण्यास अपयशी ठरले. गंभीर अवघ्या तीन रन्स करुन पेव्हेलियनमध्ये परतला. सेहवागनं आपली नैसर्गिक खेळी करत ८३ बॉल्समध्ये ६७ रन्स केले. त्यापाठोपाठ द्रविडनंही टेस्टमध्ये आणखी एक हाफ सेंच्युरी पूर्ण केली. द्रविड ६८ रन्सवर नॉटआऊट होता. सचिन मात्र पुन्हा एकदा आपल्या शंभरावी सेंच्युरी करण्यास अपयशी ठरला. सचिननं ९८ बॉल्समध्ये ७३ रन्स केले. दिवसअखेर ३ विकेट्सवर २१४ रन्स करण्यात टीम इंडियाला यश आलं.