www.24taas.com, चेन्नई
आयपीएलच्या ओपनींग मॅचची लढत डिफेंडिग चॅम्पियन्स चेन्नई सुपरकिंग्ज आणि स्टार क्रिकेटपटूंची मांदियाळी असेलल्या मुंबई इंडियन्समध्ये रंगणार आहे. होम ग्राऊंडवर खेळण्य़ाचं ऍडव्हान्टेज चेन्नईला असणारच आहे. मात्र, हरभजन सिंगची मुंबई इंडियन्स चेन्नईला पराभवाचा धक्का देण्यास आतूर असेल. महेंद्रसिंग धोनी आणि सचिन तेंडुलकर या मॅचचा प्रमुख आकर्षण ठरणार आहेत.
चेन्नई सुपरकिंग्ज महेंद्रसिंग धोनीचा मिडास टच लाभलेली टीम. तर सचिन तेंडुलकरची टीम म्हणून ओळखली जाणारी मुंबई इंडियन्स टीम. आयपीएलमध्ये नेहमीच या दोन टीमला विजयासाठी फेव्हरिट मानण्यात येतं. चेन्नईनं गेल्या सीझनमध्ये बाजी मारली होती. तर मुंबईनं चॅम्पियन्स लीग पटकावण्याची किमया साधली होती. आयपीएल सीझन पाचची सुरुवात चेन्नई विरुद्ध मुंबई अशा मॅचनं होणार आहे.
त्यामुळे टी-20 या फाटाफट क्रिकेटची ओपनिंगचं बंपर होणार यात शंकाच नाही. मुंबईची कॅप्टन्सी हरभजन सिंग करणार आहे. त्यामुळे सचिन तेंडुलकर चेन्नईच्या बॉलिंगववर तुटून पडण्यास सज्ज आहे. शिवाय कायरन पोलार्ड हे जमैकनं वादळ या टीममध्ये आहे जे कुठल्याही मैदानावर घोंगावून शकतं. तर मिडल ऑर्डरमध्ये रोहित शर्मा आणि अंबाती रायडू आहेतच. हरभजन सिंगला आपल्या स्पिनची जादू दाखवण्याची नामी संधी आहे. तर मिचेल जॉन्सन आणि आरपी सिंग आपल्या तेज बॉलिंगनं चेन्नईला दणका देण्यास तयार आहेत.
दुसरीकडे महेंद्रसिंग धोनी चेन्नईच्या टीमचा बॅकबोन आहे. त्याच्या टीममध्ये अनेक मॅचविनर आहेत. मात्र, दुखापती, ओपनिंगची चिंता आणि माईक हसीची कमी या सगळ्यावर त्याच्या टीमला मात करावी लागणार आहे. मात्र, घरच्या मैदानावर खेळतेच आहे शिवाय त्यांच्या टीम मॅचमध्ये केव्हाही कमबॅक करण्याची क्षमता आहे . दोन्ही टीम्स तुल्य़बळ असल्यानं क्रिकेटप्रेमींना तीन तासांमध्ये एक फुल ऑफ ऍक्शन पॅक्ड मॅच बघाय़ला मिळणार हे नक्की.