खासदार सचिन आता अभिनेत्याच्या भूमिकेत?

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने विधू विनोद चोपडा यांना त्यांच्य ‘फेरारी की सवारी’ या चित्रपटामध्ये आपले नाव वापण्यास परवानगी दिली आहे. मात्र, या चित्रपटात सचिन तेंडुलकर अभिनेता म्हणून आपल्या समोर येण्याची चर्चा सध्या बी टाऊनमध्ये आहे.

Updated: May 9, 2012, 06:11 PM IST

www.24taas.com, मुंबई

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने विधू विनोद चोपडा यांना त्यांच्य ‘फेरारी की सवारी’ या चित्रपटामध्ये आपले नाव वापण्यास परवानगी दिली आहे. मात्र, या चित्रपटात सचिन तेंडुलकर अभिनेता म्हणून आपल्या समोर येण्याची चर्चा सध्या बी टाऊनमध्ये आहे.

बी टाऊनमधील चर्चेनुसार सचिनने या छोट्या भूमिकेला होकार भरला असून त्याची शुटिंग तो आयपीएलनंतर करणार आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी आशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या की सचिन या चित्रपटात काम करणार नाही. परंतु आपल्या नावाचा वापर करण्याची त्याने परवानगी दिली आहे. त्यावर या चित्रपटाचे निर्माता विधू विनोद चोपडा यांनी सचिनने नाव वापरण्याची मंजूरी दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला होता.

ही आनंदाची गोष्ट आहे की सचिनने आपले नाव वापरण्याची परवानगी दिली आहे. त्याची या चित्रपटात विशेष भूमिका आहे की नाही यासाठी तुम्हांला चित्रपट पाहावा लागेल, अशी गुगलीही त्यांनी टाकली आहे. मात्र, अद्याप हे अजून गुलदस्त्यात आहे. त्यासाठी आपल्या १५ जून रोजी प्रसिद्ध होणाऱ्या फेरारीची सवारीची वाट पाहावी लागणार आहे.

फेरारी की सवारी हा चित्रपट एक मुलगा, त्याचे वडील (शर्मन जोशी) आणि त्याचे आजोबा (बोमन इरानी) यांच्यावर बेतला आहे. लहान मुलाला क्रिकेट खेळण्याची इच्छा असते. परंतु, शर्मनला सचिनची फेरारी चोरण्यास सांगितल्यावर या चित्रपटाच्या काहणीने यूटर्न घेतला आहे.

.