धोनीची जाणार कप्तानी, सेहवागची वर्णी!

ऑस्ट्रेलियात टीम इंडियाची अक्षरश: धूळधाण उडाली, ऑस्ट्रेलियात व्हाईट वॉश मिळाल्याने कॅप्टन महेंद्रसिंह धोनीची कॅप्टनशीप धोक्यात आली आहे. ऑस्ट्रेलियात झालेल्या टेस्ट सीरीजमध्ये ४-० ने हारल्याने टीम आणि कॅप्टन धोनी यांना टीकेला समोरं जावं लागत आहे.

Updated: Jan 29, 2012, 07:25 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली


ऑस्ट्रेलियात टीम इंडियाची अक्षरश: धूळधाण उडाली, ऑस्ट्रेलियात व्हाईट वॉश मिळाल्याने कॅप्टन महेंद्रसिंह धोनीची कॅप्टनशीप धोक्यात आली आहे. ऑस्ट्रेलियात झालेल्या टेस्ट सीरीजमध्ये ४-० ने हारल्याने टीम आणि कॅप्टन धोनी यांना टीकेला समोरं जावं लागत आहे.  सुत्रांनुसार ऑस्ट्रेलियात झालेला मानहानीकारक पराभवाचं खापरं हे धोनीच्या कॅप्टनशीपवरचं फोडलं जात आहे. त्यामुळे धोनीची कॅप्टनशीप जाण्याची शक्यता बळावली आहे. आणि बीसीसीआयने त्यांची पूर्ण तयारी देखील केल्याचे समजते, त्यानुसार या पुढे टेस्ट टीमचं कॅप्टन म्हणून सेहवाग असण्याची शक्यता आहे.

 

या गोष्टीवर १२ फेब्रुवारीला बीसीसीआय त्यांचा वर्किंग मिटींगमध्ये निर्णय घेणार आहे. तसचं असं बोललं जात आहे की, वीरेंद्र सेहवाग आणि धोनी यांच्यामध्ये काही मतभेद हे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातच झाले होते. त्यानंतर मैदानात सेहवाग आणि इतर काही खेळाडू यांच्यावर धोनीचा काहीच वचक राहिला नाही नव्हता असचं दिसत ं होतं. त्यामुळे हया दोघांमध्ये पडलेली फूट ही आपल्या या कामगिरीला जबाबदार असल्याचे मानले जात आहे

 

बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी राजीव शुक्ला यांनी शनिवारीच वक्तव्य केलं आहे की, आपण चागलं प्रदर्शन केललं नाही. आणि हे सगळेच मान्य करतील सुद्धा. तसचं ऑस्ट्रेलिय खेळाडू खूप चांगला खेळ केला हे देखील नाकारून चालणार नाही. त्यामुळे आम्ही देखील तेवढेच चिंताग्रस्त आहोत, त्यामुळे लवकरच काही फेरबदल केले जातील. इंडिया यापुर्वी गेल्या वर्षी जुलै - ऑगस्ट मध्ये इंग्लंड विरूद्ध झालेल्या सीरीजमध्ये देखील ४-० असा मानहानीकारक पराभव स्विकारून आली होती.

 

गेल्या चार दशकापासून ह्यावेळी पहिल्यांदा असं घडतं आहे की, भारताला परदेशात एकापोठोपाठ असं दोनंदा व्हॉईट वॉश मिळाला आहे. याआधी १९५९ ते १९६८ मध्ये भारताला परदेशात लागोपाठ चार सीरीजमध्ये क्लीनस्वीप मिळाला होता. टीम इंडियाला तेव्हा इंग्लंडने १९५९ मध्ये इंग्लंडने ५-०, वेस्टइंडीजने १९६१-६२ मध्ये ५-०, तर पुन्हा इंग्लंडने १९६७ मध्ये ३-० आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाने १९६७-६८ मध्ये ४-० ने हरवलं होतं.