धोनी, सेहवागचा वाद चव्हाट्यावर

भारताचा सुरू असलेला ऑस्ट्रेलिया दौरा भारताला काही फलदायी ठरत नाहीये असचं दिसतं आहे. लागपोठ दोन वनडे मॅचमध्ये पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.

Updated: Feb 22, 2012, 10:53 AM IST

www.24taas.com, ब्रिस्बेन

 

भारताचा सुरू असलेला ऑस्ट्रेलिया दौरा भारताला काही फलदायी ठरत नाहीये असचं दिसतं आहे. लागपोठ दोन वनडे मॅचमध्ये पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे आधीच टीकेचे धनी ठरणारी टीम इंडिया आपल्या अतंर्गत वादानेही त्रस्त झाले आहेत. काही सिनियर्स खेळाडूंच्या स्लो फिल्डिंगवर ताशेरे ओढणाऱ्या कॅप्टन महेंद्रसिंग धोनीला वीरेंद्र सेहवागनं उत्तर दिल्यानं टीम इंडियातील फूट उघड आली आहे.

 

धोनी आणि सेहवाग यावरुन आमनेसामने आले आहेत. धोनीनं सीनिअर्संना सुस्त म्हटल्यानंतर वीरेंद्र सेहवागनं पलटवार करत सीनिअर्स सुस्त नसल्याचं म्हटलं आहे. मी स्वत: गेल्या १० वर्षांपासून चांगली फिल्डींग करत असल्याचं सेहवागनं म्हटलं आहे. सिनिअर्स खेळाडुंच्या स्लो फिल्डींगमुळं ज्युनिअर खेळाडूंना जास्त रन्स बनवावं लागतात असं म्हटलं होतं.

 

चांगल्या स्लो फिल्डिंगबाबत आपल्याला वा कोणत्याही सिनिअर प्लेअरला कोणतीही माहिती देण्यात आलं नसल्याचं सांगत, वीरेंद्र सेहवागनं कॅप्टन महेंद्रसिंग धोनीवर अप्रत्यक्ष हल्लाबोल केला आहे. धोनी काय म्हणाला किंवा प्रसारमाध्यमांत काय चर्चा आहेत, याची आपल्याला कल्पना नाही, मात्र नवोदितांना संधी देण्याची गरज असल्याचं धोनीनं आपल्याला फक्त रोटेशन पॉलिसीबाबत सांगितल्याचं सेहवागनं म्हटलं आहे.