www.24taas.com, मेलबर्न
दुस-या टी-20 मॅचमध्ये टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्सनं पराभव केला. या विजयासह धोनी बिग्रेडला ऑस्ट्रेलिया दौ-यातील आपला पहिला विजय मिळवण्यात यश आलं. गौतम गंभीर आणि कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं भारताला विजयश्री मिळवून दिली.
गंभीरनं टी-20 करिअरमधील सातवी हाफ सेंच्युरी झळकावली. त्यानं 56 रन्सची नॉटआऊट इनिंग खेळली. पदेशात तब्बल 16 पराभवनंतर टीम इंडियाला विजय मिळवता आला आहे. तर कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं नॉटआऊट 21 रन्स केले. बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग अशा तिन्ही आघाड्यांवर भारतीय टीम कांगारूंवर भारी पडली.
टीम इंडियाचा ऑल राऊंडर रवींद्र जाडेजाला मॅन ऑफ द मॅचने गौरवण्यात आलं आहे. जाडेजाने एक विकेट घेतली तर दोन बॅट्समनला रन आऊट केल. जडेजाने डेविड हसीला आपल्याच बॉलवर कॅच आऊट केल. तर ऍरॉन फिन्च आणि जॉर्ज बेली यांना जडेजाने रन आऊट केल. त्याच्या या कामगिरीमुळेच त्याला मॅन ऑफ मॅचने गौरवण्यात आलं.
या विजयामुळे भारताने परदेशातील पराजयाची मालिका भंग केली आहे. या विजयामुळे भारताने २ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी मिळवली आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ १९.४ षटकात १३१ धावांवर गारद झाला. भारताकडून क्षेत्ररक्षकांनी नेत्रदीपक कामगिरी करत चार ऑस्ट्रेलियन खेळाडूंना तंबूत पाठविले. तर प्रविण कुमार आणि राहुल शर्मा यांनी प्रत्येकी दोन तर विनय कुमार आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
ऑस्ट्रेलियाकडून फिन्च यांना सर्वाधिक ३६ धावा केल्या. त्याला वॅड (३२) आणि डेव्हिड हसी (२४) यांनी चांगली साथ दिली मात्र, इतर ऑस्ट्रेलियन संघाने निराशा केली. भारताकडून क्षेत्ररक्षकांची कामगिरी जबरदस्त होती.
मेलबर्न टी-20 मॅचमध्ये टीम इंडियाच्या बॉलर्सनी जबरदस्त बॉलिंग केली आहे. फास्ट आणि स्पिनर्सनी कांगारु बॅट्समनना चांगलाच दणका दिला आहे. भारतीय बॉलर्सनी कांगारू बॅट्समना स्थिरावण्याची संधीच दिली नाही.
[jwplayer mediaid="41211"]